Ladki Bahin Yojana News January 2025 : मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणीला दिलेले 7500 रुपये घेतले परत !

Ladki Bahin Yojana News January 2025 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 पासून मोठ्या लाडीगोडीने सरकारने महिलांना मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana सुरू करून पैसे वाटप करणे सुरू केले आहे.आता ही योजना सुरू आहे मात्र सरकारने अपात्र ठरलेल्या महिलांचे पैसे परत घेण्याची सुरुवात केली आहे.त्यामुळे आता सर्व पात्र अर्जांची फेरचौकशी आणि निकष बदलून आपल्या लाडक्या बहिणींना अपात्र करणे आणि त्यांना पैसे देणे बंद करण्याचा निर्णय घेतला की काय? अशी चर्चा होऊ लागली आहे.

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात एका लाडक्या बहिणीचे 7500 रुपये मुख्यमंत्र्यांनी (अर्थातच Ladki Bahin Yojana क्रियानवीत करणाऱ्या यंत्रणेने) बँक खात्यातून परत घेतले आहे.त्यामुळे सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आणखीन कडक नियम आणि निकष आणून आधी अर्ज स्वीकारून आणि पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलाना अपात्र तर करणार नाही ना,आणि सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याने पुढे ही योजना बंद करण्याचे उद्देश्य तर नाही ना,अशी शंका आणि चर्चा लाडक्या बहिणी आणि नागरिकांमध्ये या कारवाईमुळे आता होताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

धुळे जिल्ह्यात हा प्रकार समोर आला आहे.या योजनेत अर्ज केलेले आणि आधी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील एका लाडक्या बहिणीच्या अर्जाला नाकारून त्याला अपात्र करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या लाडक्या बहिणीला सरकारने दिलेले साडेसात हजार रुपये तिच्या बँक खात्यातून परत घेण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना पुन्हा चर्चेत आणि वादात सापडताना दिसत आहे.

नकाणे गावातील लाडक्या बहिणीचे अर्ज स्वीकारले,पैसे ही दिले पण परत सरकारी तिजोरीत जमा केले.

प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या एका महिलेच्या अर्जाला नाकारून यापूर्वी तिला दिलेले साडेसात हजार रुपये बँक खात्यातून परत घेत ते पैसे सरकारी तिजोरीत जमा करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.या कारवाईदरम्यान प्रशासनाकडून धुळे जिल्ह्यातील नकाने या गावात राहणाऱ्या आणि खैरनार आडनाव असलेल्या महिलेने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता.

सरकार आणि प्रशासनाकडून पोर्टलवर तिच्या अर्ज स्वीकार केल्यानंतर खैरनार नावाच्या या महिलेच्या बँक खात्यात साडेसात हजार रुपये हप्त्यापोटी जमा करण्यात आले होते.ही रक्कम आता तिच्या बँक खात्यातून परत घेतल्या गेली आहे.

पात्र नसल्याने दिलेला Ladki Bahin Yojana लाभ परत घेतला.

दरम्यान धुळे जिल्ह्यात प्रशासनिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार,नकाने या गावातील सदर महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसतानाही तिने अर्ज केला होता.तिचा अर्ज स्वीकारण्यात आला,त्यामुळे तिला लाभाची रक्कम बँक खात्यातून देण्यात आली.या संदर्भात तक्रार मिळाल्याची माहिती ही समोर आली.त्यामुळे यात चौकशी करण्यात आली.

त्याच्यात ती महिला योजनेसाठी पात्र नसल्याचे आणि तिने योजनेचा विविध प्रकारे लाभ घेतल्याची बाब चौकशीतून समोर आली आहे. आणि याच कारणामुळे या लाडक्या बहिणीचे पैसे सरकारकडून पुन्हा परत घेण्यात आले. हे 7500 हजार रुपये तिच्या बँक खात्यातून पुन्हा सरकारी तिजोरीत वळते करण्यात आले आहे,अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे.

निवडणुकीनंतर Ladki Bahin Yojana घोषणेप्रमाणे 2100 रुपये दिले नाही.

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना पुढे 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असल्याची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती. मात्र निवडणूक झाल्यानंतर आणि या निवडणुकीत लाडक्या बहिनींनी भरभरून महायुतीला मत देऊन विजयी केल्याचा दावा होत आहे. मात्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी योजनेतील डिसेंबर 2024 च्या हप्त्यापोटी लाभार्थी महिलांना पुन्हा 1500 रुपये बँक खात्यात टाकले आहे.

अर्ज,पात्रता, दिलेला लाभ, पुन्हा पडताळणी आणि पैसे परत घेण्याने लाडक्या बहिणीत चिंता.

या प्रकारमुळे आता पुढील दिवसात ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या या योजनेच्या नियमाने निकषात बसत नाहीत त्यांचा आर्थिक लाड सरकार पुरविणार नसल्याचे दिसत आहे. खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या,तर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलून पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची आणि त्यांना दिलेल्या लाभाची पुन्हा पडताळणी होऊन पैसे परत घेणार असे संकेत दिले होते.

प्रत्यक्षात आता एका लाडक्या बहिणीला दिलेले पैसे तिच्या बँक खात्यातून परत घेण्याच्या या घटनेमुळे पैसे परत घेण्यास सुरुवात तर केली नाही ना?अशी चर्चा होत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता एकूणच सर्व लाडक्या बहिणींना आपणही कोणत्या निकष आणि नियमामुळे अपात्र तर ठरणार नाही ना, ही चिंता निर्माण होऊ शकते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

19 − eight =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.