Republic Day Holiday : देशभक्तीच्या 8 थीम वर प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याचे सरकारी फर्मान.
प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक अवकाश असतो,.आता नुकतेच सरकारने एक परिपत्रक काढून 26 जानेवारी 2025 ची सुट्टी रद्द केली आहे.त्यामुळे आता यापुढेही प्रजासत्ताक दिनी 26जानेवारीला सुट्टी मिळणार नाही असे मंगळवारी निघालेल्या या शासन परिपत्रकात म्हटलेले आहे.येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी सर्व शाळांमध्ये सुट्टी रद्द करून देशभक्तीच्या विविध थीमवर स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे.
नागरिक आणि मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजावी म्हणून, देशभक्तीवर आधारित कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करून या सर्व कार्यक्रमाना सर्वांना उपस्थित ठेवण्यासाठी तसेच या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची ही जबाबदारी सरकारने जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेली आहे.
सरकारने दरवर्षी प्रजासत्ताक दिनी देण्यात येत असलेली सुट्टी यंदा रद्द केलेली आहे. मंगळवार 31 डिसेंबर रोजी हे सरकारी परिपत्रक काढण्यात आले यात सर्व खाजगी आणि शासकीय शाळांमध्ये विविध देशभक्तीच्या थीमवर आधारित आठ प्रकारचे विविध कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहे.
दरम्यान सरकारने फक्त शासकीय आणि खाजगी शाळांसाठी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द केली आहे की, सर्व शासकीय कार्यालय आणि इतर निम शासकीय कार्यालयांनाही सुट्टी असेल?याबाबत कोणताही इतर परिपत्रक काढलेला नाही.
दरवर्षी भारतात 26 जानेवारी रोजी रिपब्लिक डे (Republic Day)अर्थातच गणतंत्र दिवस साजरा करण्यात येते. 15 ऑगस्ट 2047 रोजी ब्रिटिश शासनाच्या गुलामीच्या जोखंडातून मुक्त होऊन भारत देश.त्यानंतर 26 जानेवारी 1949 या दिवसापासून देशाचे नवीन संविधान अमलात येऊन भारत हा संवैधानिक आधारावर चालणारा प्रजासत्ताक देश म्हणून जगात अस्तित्वात आला.त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दरवर्षी 26 जानेवारीला संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिवस साजरा होतो.
या दिवशी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय खाजगी शाळा महाविद्यालयांमध्ये सकाळी राष्ट्रध्वजाला सलामी आणि विविध देशभक्ती पूर्ण कार्यक्रम साजरे केले जातात. यानंतर मात्र प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक अवकाश असतो.
काय म्हटले आहे शासन परिपत्रकात.
31 डिसेंबर रोजी शासनाकडून प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी रद्द करण्याचे परिपत्रकात फर्मान देण्यात आले असून,यात सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये राष्ट्रध्वज वंदना नंतर दिवसभर देशभक्तीच्या थीमवर आधारित 8 प्रकारचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करताना विद्यार्थ्यांना राष्ट्रीय इतिहास अवगत करावा,देशाची महान संस्कृती आणि देशाचे भविष्य यावर आधारित हे कार्यक्रम असावेत. असे या परिपत्रकात म्हटले आहे.
हे आहेत परिपत्रकात देशभक्तीचे आठ कार्यक्रम.
सरकारने प्रजासत्ताक दिनी सर्व शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये देशभक्तीच्या थीमवर आधारित 8 कलमी कार्यक्रम आणि स्पर्धां आयोजित करण्यासाठी निर्देश देतानाच याची यादी दिली आहे.यात राष्ट्रध्वज वंदन नंतर प्रभातफेरी,दिवसभर वक्तृत्व,कविता,चित्रकला,निबंध आणि विविध खेळ स्पर्धा आणि देशभक्तीचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे.
26 जानेवारी रोजी दिवसभर हे सर्व कार्यक्रम फक्त देशभक्ती थीमवरच आधारित असणे आवश्यक करण्यात आले आहे.महाराष्ट्रात यंदा प्रजासत्ताक दिनी सुट्टी रद्द करून,शाळांमध्ये परिपत्रकानुसार दिलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना निर्देश देण्यात आलेले आहे.