HO Railway Quota : दैनंदिन जीवनात रेल्वे प्रवास हा महत्त्वाचा भाग आहे. सर्वांना लांब पल्ल्यासाठी रेल्वे प्रवास करावा लागतो. यासाठी रेल्वे तिकीट आरक्षित करताना आपली तिकीट कन्फर्म होणे ही चिंतेची बाब असते. रेल्वे बुकिंग मध्ये खूप वेटिंग असल्याने तिकीट कन्फर्म होणे म्हणजे एखादी लढाई जिंकण्यासाठी असते.मात्र तिकीट कन्फर्म करण्यासाठी अनेक पर्याय असते.
मात्र सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना याची फारशी माहिती नसते.यात सर्वसामान्य रेल प्रवासी आपात्कालीन परिस्थितीत एचओ रेल्वे कोट्याचा (HO Railway Quota) वापर करून आपली तिकीट कन्फर्म करू शकतात.मात्र जेव्हा प्रवास करणे खूप गरजेचे आणि महत्त्वाचे असते.त्यावेळीच रेल्वे प्रवासासाठी या कोट्याचा वापर करू शकतो. काय आहे हा कोटा तर चला याबाबत आपण जाणून घेऊया.
भारतात लांबच्या प्रवासासाठी अधिकांश लोक रेल्वेतून प्रवास करण्याला प्राधान्य देतात यासाठी रेल्वे तिकीट आरक्षित करणे ती कन्फर्म करणे महत्त्वाचे असते रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची मोठी संख्या असल्याने रेल्वेत खूप गर्दी असते आणि यात तिकीट कन्फर्म झाली तर आरामदायी प्रवास होते. मात्र रेल्वे तिकीट कन्फर्म करणे ही सर्वांसाठी महत्त्वाची बाब असते यात तिकीट बुकिंग करताना सीट आरक्षित होण्यासाठी वेटिंग लिस्ट असते त्यामुळे यात खूप स्पर्धा दिसून येते.
यामुळेच अनेक नागरिक प्रवासाच्या दिवसापूर्वी खूप अगोदर आपली टिकीट बुक करतात. मात्र त्यातही तिकीट कन्फर्म होण्याची शाश्वती नसते. अनेक लोक तर तिकीट बुकिंग सुरू होताच ऑनलाइन रेल्वे टिकीट बुकिंग करतात तर अनेक लोक असे असतात की जे रेल्वे स्टेशन मध्ये पहाटेपासून रांगा लावून राहतात.
काय आहे हा HO कोटा.
अनेक लोक रेल्वे तिकीट बुकिंग आणि कन्फर्मेशन साठी विविध कोट्यांचा वापर करतात. यात हेडक्वार्टर कोटा (HO) वापरून मीटिंगमध्ये असलेली रेल्वे टिकीट कन्फर्म होते मात्र या कोट्याचा वापर करण्यासाठी काही अटी आणि निकष आहेत ते पूर्ण केले तर या कोट्यातून रेल्वे तिकीट बुक होऊन कन्फर्मेशन ची शक्यता वाढते. महत्त्वाच्या वेळीस या कोट्याचा वापर करता येऊ शकते.
कोण वापरू शकतात HO कोटा?.
रेल्वे एच ओ कोट्याला हेडक्वार्टर कोटा किंवा मुख्यालय कोटा ही म्हटल्या जाते. रेल्वे विभागाकडून हा एक विशेष प्रकारचा कोटा अलर्ट केल्या जातो जे वरिष्ठ रेल्वे अधिकारी विवेक सरकारी पाहुणे आणि व्हीआयपी व्हीआयपी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येते.व्हीआयपी, खासदार, आमदार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरकारी अधिकारी यांना रेल्वेतून प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हा कोटा राखीव असतो.
रेल्वे प्रशासनातील अधिकारी आपल्या प्रशासनिक कामांसाठी रेल्वे प्रवासाची गरज असली तर हा HO कोटाचा वापरतात.मात्र असे असले तरी आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक तिकीट बुकिंग आणि कन्फर्मेशन साठी या कोट्याचा वापर करू शकतात.
सर्वसामान्य प्रवाशांना आपातकालीन परिस्थितीत मिळते फायदा?.
जर सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना या एच ओ कोट्यातून प्रवास करण्याची गरज पडली तर यातून तिकीट कन्फर्म होते का? याचा उत्तर होय असा आहे. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा सर्वसामान्य व्यक्तीला अचानक रेल्वे प्रवास करावा लागला आणि रेल्वेमध्ये सीट उपलब्ध नसेल तर आपत्कालीन परिस्थितीचा हवाला देऊन योग्य आणि सत्य माहिती देवून या कोट्यातून तिकीट कन्फर्म करता येते. आपत्कालीन परिस्थितीत असली तरच रेल्वे विभाग या कोट्यातून सीट कन्फर्म करून देते.
इतर सामान्य वेळी या कोट्याचा सर्वसामान्य व्यक्ती प्रवासात तिकीट कन्फर्म करून रेल्वे प्रवास मध्ये लाभ घेऊ शकत नाही. विशिष्ट आपात्कालीन परिस्थितीमध्ये सामान्य प्रवाशांना रेल्वे प्रशासन या कोट्याचा वापर करण्याची परवानगी देते गंभीर आजार किंवा मृत्यू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशाला रेल्वे अधिकारी परिस्थिती आणि गंभीरता पाहून या कोट्याचा वापर करून तिकीट कन्फर्म करतात,आणि रेलयात्रेची अनुमती देतात. पण यातही महत्त्वाची बाब म्हणजे यातून तिकीट कन्फर्म होईल याची गॅरंटी नसते मात्र याचा निर्णय रेल्वे अधिकारी घेऊ शकतात.
अशी होते तिकिट बुकिंग?.
रेल्वे स्टेशन मध्ये किंवा ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करताना सर्वांसाठी एच ओ कोटा उपलब्ध नसतो. रेल्वेतून इतर सर्व श्रेणीतील तिकीट बुकिंग होत असल्याने त्यातील एखादा तिकीट आधी बुक करावे लागते. सर्वसामान्य नागरिकाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये रेल्वे प्रवास करायचा असेल, तर यासाठी रेल्वे मुख्यालयात जाऊन एचओ कोट्यासाठी अर्ज करावे लागते.
याचा वापर करण्यासाठी अर्जासह प्रवासाची कारणे आणि आवश्यक कागदपत्रे रेल्वे अधिकाऱ्यांना सादर करावी लागते.अर्ज आणि कागदांची तपासणी केल्यानंतरच रेल्वे अधिकाऱ्यांना संबंधित अर्ज करणारा नागरिकाला हा रेल्वे प्रवास गरजेचा आहे असे वाटला,तरच एचओ. कोट्यातून तिकीट कन्फर्म करण्यात येते.