Teacher Salary Hike : शिक्षकांची पगारवाढीची 12 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली,पगारात 20 टक्क्यांची वाढ.
राज्यभरातील सरकारी शिक्षकांची पगारवाढीची प्रतीक्षा अखेर 12 वर्षानंतर संपुष्टात आली असून शिक्षकांना 20 टक्क्यांची पगार वाढ देण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यभरातील 50 शिक्षकांना 20 टक्के अनुदान टप्पा वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यानंतर राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या निर्णयावर अंमलबजावणी सुरू झाली नव्हती. बारा वर्षानंतर आता शिक्षकांची या निर्णयामुळे वेतन वाढीची प्रतीक्षा संपली आहे.
शिक्षकांना वेतन टप्पा वाढसाठी जिप. शिक्षण विभागाकडून पात्र शाळांची यादी मागविली.
पूर्वी झालेल्या या निर्णयानुसार शिक्षण विभागाने विविध वेतनश्रेणीतील शिक्षकांना वेतन टप्पा वाढ देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पात्र शाळांची यादी आणि शिक्षकांची माहिती 10 डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत मुख्याध्यापकांना दिली होती. त्यामुळे ही माहिती जमा करण्यासाठी विविध जिल्ह्यात मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गर्दी केली होती. विशेष म्हणजे या निर्णयामुळे विविध जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील हजारो शिक्षकांना वेतन वाढीचा लाभ मिळणार असून पूर्वलक्षी प्रभावातून हा आदेश लागू करण्यात आला आहे.
विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना आता पर्यंत 80टक्के वेतन वाढ.
महाराष्ट्रात विनाअनुदानित शाळांना कधी ना कधी अनुदान मिळणार या आशेवर हजारो शिक्षक कायम अनुदानित शाळांवर विनावेतन काम करत होते. 2001 पासून सरकारने कायम अनुदानित शाळा तत्वांवरच विनाअनुदानित शाळांना आणि त्यांच्या शिक्षकांना मान्यता दिली आहे. 2009 ला कायम विनाअनुदानित शाळा समोरील कायम शब्द बदलल्यानंतर अशा शाळांना 2000 वर्ष 2016 ला अनुदानाचा पहिला टप्पा देण्यात आला होता.
यानंतर 2020 मध्ये 40%, 2022 मध्ये 60 टक्के पर्यंत आणि आता 2024 या निर्णयामुळे या शिक्षकांना एकूण 80 टक्के वेतन वाढीचा लाभ होणार आहे.एक जून 2025 पासून पूर्व लक्षी प्रभावाने शिक्षकांना वाढीव वेतन अनुदान मिळणार आहे.या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विनाअनुदानित श्रेणीतील शाळांमध्ये 20 टक्के वेतन घेणाऱ्यांना शिक्षकांना 40 टक्के,40 टक्के वेतन घेणाऱ्यांना शिक्षकांना 60 टक्के, आणि 60 टक्के वेतन घेणाऱ्यांना शिक्षकांना 80 टक्के पगारवाढीचा लाभ होणार आहे.