RBI Governor Sanjay Malhotra : 450 कोटी रुपयांच्या बंगल्यात राहून आरबीआय चे गव्हर्नर घेतात इतकी किती पगार आणि सुविधा ?
देशाची नाडी असलेले अर्थकारण आणि चलनी नोटा चे संचलन आणि व्यवस्थापन करण्यात भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया चे गव्हर्नर यांची महत्त्वाची भूमिका असते. आरबीआयचे गव्हर्नर म्हणजे एका प्रकारे देशाच्या खजिन्याचे पहारेकरीच असतात.त्यामुळे देशात त्यांचा एक वेगळा प्रभाव आणि शासकीय आणि सार्वजनिक सन्मान मिळतो,तर दुसरीकडे आरबीआय गव्हर्नर यांना विविध शासकीय सेवा सुविधा असतात.
आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून आता आर्थिक क्षेत्रातील विशेषज्ञ संजय मल्होत्रा पदभार सांभाळणार आहे.संजय मल्होत्रा हे भारतीय प्रशासनिक सेवेतील 1990 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आरबीआयचे गव्हर्नर होण्यापूर्वी ते केंद्रीय महसूल मंत्रालयीन विभागात सचिव पदावर होते.ते बुधवार 11 डिसेंबर रोजी आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून पदभार सांभाळणार आहेत.आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ संपल्याने मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा राहणार असून केंद्र सरकार त्यांच्या कार्यकाळ वाढवू सुद्धा शकते.या निमित्ताने आपण पाहूया रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांना सरकारकडून कोणत्या सोयी सुविधा मिळतात त्यांना राहण्यासाठी किती कोटींचा निवासस्थान आहे आणि त्यांच्या पगार किती आहे.
आरबीआय गव्हर्नर यांना राहण्यासाठी कोट्यवधींचा बंगला.
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांना राहण्यासाठी मुंबईमधील उच्चभ्रू आणि श्रीमंत लोक राहतात,त्या मलबार हिल या भागात बंगला आहे. हा बंगला खूप प्रशस्त आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज आहे. माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्या मते या बंगल्याची किंमत तब्बल 450 कोटी रुपये इतकी असू शकते. डिजिटल मीडियाच्या एका चॅनलला मुलाखत देताना माझी गव्हर्नर राजन यांनी गव्हर्नर बंगल्याच्या किमती संदर्भात किमतीचा हा अंदाज वर्तविला होता.
इतका मिळतो आरबीआय गव्हर्नरना पगार?
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांना 2 लाख 50 हजार रुपयांचा मासिक वेतन (RBI Governor Salary) मिळत असल्याची माहिती एका आरटीआयच्या माध्यमातून समोर आली होती. गव्हर्नर यांना मिळणाऱ्या वेतनाची माहिती मागितली असता यापूर्वीचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना इतका वेतन मिळत असल्याची माहिती समोर आली. तर त्यांच्या पूर्वीचे गव्हर्नर असलेले उर्जित पटेल यांना सुद्धा इतकाच मासिक वेतन मासिक मिळत होता. याव्यतिरिक्त आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नरला गव्हर्नर पेक्षा थोडा कमी म्हणजेच दोन लाख 25 हजार मासिक वेतन मिळतो तर आरबीआयचे कार्यकारी संचालक यांना दोन लाख 16 हजार रुपये मासिक वेतन देण्यात येते. याव्यतिरिक्त आरबीआयचे गव्हर्नर यांना इतर शासकीय सेवा सुविधा आणि भत्ते लागू राहतात सोबतच कुटुंबांसोबत शासकीय बंगल्यात राहताना सुविधांचा लाभ घेवू शकतात.
RBI चे नवे गव्हर्नर होणारे संजय मल्होत्रा यांनी केले ऊर्जा, वित्त,टॅक्स,माहिती तंत्रज्ञान आणि खाणकाम क्षेत्रात उत्कृष्ट काम.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा हे बुधवारी पदभार सांभाळतील.IAS असलेले मल्होत्रा यांनी आयआयटी-कानपूरमधून उच्च शिक्षण पूर्ण केले असून याव्यतिरिक्त त्यांनी अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. राजस्थान केडर मधून 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी संजय मल्होत्रा यांनी आपल्या 33 वर्षांच्या प्रशासनिक सेवा आणि कारकिर्दीत देशात ऊर्जा, टॅक्स,माहिती तंत्रज्ञान आणि खाणकाम या विविध क्षेत्रांमध्ये वी विविध उच्च पदावर उत्कृष्टरित्या काम केले आहे.आरबीआयचे पद सांभाळत असताना यापूर्वी ते केंद्रीयअर्थ मंत्रालयात महसूल सचिव पदावर कार्यरत होते.यापूर्वी त्यांनी वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा (Intarnel Financeial Service) विभागात सचिव पदावर सुद्धा कार्य केले आहे.