Solar Generator : लहानसा Solar Generator तुमची वीज समस्या दूर करणार.
दैनंदिन सर्व व्यवहारात विजेची खूप गरज राहते.अचानक लाईन गेली, विजपुरवठा खंडित झाला आणि इन्व्हर्टर किंवा जनरेटर नसले तर सर्वसामान्य नागरिक गृहिणींना विद्यार्थ्यांना आणि व्यवसायिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. पण आता नागरिकांसाठी छोटासा जनरेटर अचानक आलेली विजेची अडचण किंवा जरुरी काम पूर्ण करणार आहे. हा स्मॉल जनरेटर सौर उर्जेवर,(Soller Power)आधारित असून याद्वारे मोफत वीज मिळून घरातील टेलिव्हिजन ते फॅन आणि लहान घरेलू इलेक्ट्रॉनिक उपकरण चालू शकतात.विशेष म्हणजे या छोट्याशा सोलर जनरेटर ची किंमत सुद्धा सर्वांना परवडणारी आहे.
लहान सोलर जनरेटर विज समस्या दूर करणार.
खूप कमी किमतीत घरात आणि व्यवसायिक ठिकाणी लागणारा हा छोटा सोलर जनरेटर सौर उर्जेवर चालणारा असून विजेचे मोफत पर्याय देते. घरातील अनेक छोटे उपकरण याद्वारे कामी येते. जर आपण घरात इन्व्हर्टर बसविण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात सोलर जनरेटर हा एक खूप स्वस्त उपाय म्हणून समोर आला आहे.याला पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर ( Portable Solar Power Generator ) असेही म्हणतात.म्हणतात. हे लहान सोलर जनरेटर घरात कुठे छोटीशी जागा घेतो आणि संपूर्ण घराला सौर ऊर्जेने वीज पुरवून खंडित वीज पुरवठ्याला आणि गरज भासल्यास केव्हाही मोफत वीज वापरण्याचा पर्याय देतो. हा लहान जनरेटर असल्याने सुविधेनुसार याला कुठेही घेऊन जाता येते.
सध्या हा पोर्टेबल सोलर पावर जनरेटर SARRVAD नावाने बाजारात उपलब्ध आहेस सोबतच याला कोणी Amazon वरून ऑर्डर करून खरेदी करू शकतो आणि या लहान सोलर जनरेटर ची किंमत फक्त 19,000 रुपये इतकीच आहे.अनेक प्रकारच्या डिस्काउंट ऑफर्स ( Discount Offer ) आणि बँक ऑफर्स सुद्धा याला खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत.आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला ते EMI वर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला त्यात EMI चा पर्याय देखील मिळेल. कंपनी या उत्पादनावर 1 वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.
ही आहेत छोट्या सोलर पावर जनरेटरची वैशिष्ट्ये.
हा लहान सोलर पावर जनरेटर आकाराने खूप लहान असून सुद्धा संपूर्ण घराला वीज पुरवठा करू शकतोत्याच्या आकाराबद्दल सांगायचे तर, ते खूप लहान आहे परंतु ते तुमच्या संपूर्ण घराला वीज पुरवू शकते. सोलर पॉवर जनरेटर ( Solar Power Generator ) ने लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर लहान इलेक्ट्रॉनिक उपकरण चालतात. याची क्षमता 42000mAh 155Wh इतकी आहे. विशेष म्हणजे हे लहान जनरेटर खूप दीर्घ कालावधीसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांना वीज पुरवठा करण्यास सक्षम असते. याला विकणाऱ्या एका कंपनीकडून तर असा धावा करण्यात आला आहे की या सोलर जनरेटर च्या माध्यमाने आयफोन 8 ची बॅटरी तब्बल आठ वेळा चार्ज केली जाऊ शकते.