RBI Indian Currency : नोटेवर महात्मा गांधी च्या जागेवर लागणार ह्यांचा फोटो,आरबीआय ने केले स्पष्ट ? भारतीय चलनावर आता महात्मा गांधी यांच्या फोटोच्या जागी दुसऱ्या व्यक्तीचा फोटो छापल्या जाणार असल्याची चर्चा सुरु असताना यावर देशात चलनी नोटा अमलात आणण्यासाठी अधिकृत आदेश देणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडिया ने याबाबत आपला स्पष्टीकरण दिला आहे.उल्लेखनीय म्हणजे भारतीय करन्सी वर देशाच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात येतो.स्वातंत्र्यानंतर सेंट्रल बँकेने हा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत महात्मा गांधी यांचे फोटो छापले जात आहे.मात्र नुकतेच सोशल मीडियावर जी माहिती वायरल होत आहेत त्यानुसार आता भारतीय करन्सीवर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो लावला जाणार आहे.पण आरबीआयकडूनही या बाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते आतापर्यंत भारताच्या चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र छापले जाते याबाबत आतापर्यंत कोणताही मुद्दा आणि चर्चा सार्वजनिक झाली नाही.मात्र सोशल मीडियावर वायरल होत असताना,रिझर्व बँक ऑफ इंडिया या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.सोशल माध्यमांवर भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांच्या फोटोच्या जागी रवींद्रनाथ टागोर आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे वॉटर मार्क असलेले चित्र छापण्यात येणार असल्याची माहिती वायरल होत होती. दरम्यान आरबीआय ने या संबंधात कोणताही प्रस्ताव नसून ही फक्त अफवा असल्याचे म्हटले आहे.
नोटेवर छापण्यासाठी महात्मा गांधीजीं फोटो एकमेव ट्रेड मार्क नाही.
विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत देशाच्या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात येतो मात्र आरबीआयकडून हा एकमेव फोटो किंवा ट्रेडमार्क नाही महात्मा गांधी यांचा संरक्षित फोटो नसून गांधीजीचा चेहरा जतन केलेल्या फोटोमधून या फोटोला जतन करण्यात आले आहे.भारताच्या स्वातंत्र्यानंतर आरबीआय कडून देशात नोटा चलनात आणण्यासाठी जे नोटा छापल्या जात आहेत,त्यात सुरुवातीपासून ते आतापर्यंत एक, दोन, पाच, दहा, पन्नास,शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र छापण्यात येते.सर्व नोटांवर महात्मा गांधी यांची फोटोची प्रतिमा एकसारखी राहते,यात एक नोट मध्ये असलेला फोटो महात्मा गांधी हे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम मध्ये बसलेले असताना काढलेला फोटो मधील फोटो आहे. देशात एक रुपयाच्या नोटेमध्ये आणि एका नाण्यांमध्ये महात्मा गांधी यांचे फोटो छापण्यात आले होते पण हे संरक्षित फोटो नव्हते.
पहिल्यांदा छापला गेला महात्मा गांधी यांच्या हसतमुख चेहरा.
सर्वप्रथम 500 नोटमध्ये महात्मा गांधी यांचे चित्र छापण्यात आले होते.1987 मध्ये आरबीआयकडून हा नोट जारी करण्यात आला होता,ज्यात महात्मा गांधीचे चित्र हसतमुख होते,सोबतच बाकीच्या या नोटावर लॉयन कॅपिटल सोबतच अशोक स्तंभाचा वॉटरमार्क होता.आरबीआयच्या माहितीनुसार ह्या नोटा देशात 1996 यावर्षी जारी झाल्या.यासोबतच 5,10,20,100 आणि 500 सह 1 हजार रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या.मात्र1996 पूर्वी तसेच1986 मध्ये फोटो वॉटर मार्क म्हणून महात्मा गांधी यांचा फोटो जोडला गेला जो करन्सी च्या उलट्या बाजूला दिसत होता.