Nitin Gadkari यांचं Ladki Bahin Yojana संदर्भात मोठं वक्तव्य,शासनाच्या भरवशावर राहू नका,पैशे मिळणार की नाही स्पष्ट सांगितले.

Nitin Gadkari यांचं Ladki Bahin Yojana संदर्भात मोठं वक्तव्य,शासनाच्या भरवशावर राहू नका,पैशे मिळणार की नाही स्पष्ट सांगितले.

शासन विषकन्या असते,उद्योजकांनी अनुदानावर अवलंबून न राहता स्वतःगुंतवणूक करावी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उद्योजकांना सल्ला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

लाडकी बहीण योजने द्वारे राज्यातील महिलांना पंधराशे रुपये महिना दिल्या जात आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात शासकीय तिजोरीवर आर्थिक ताण आहे.या योजनेच्या आर्थिक पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.विदर्भातील उद्योजकांनी शासननाच्या अनुदान किंवा आश्वासनांवर निर्भर राहू नये. स्वतःच्या हिम्मतवरच गुंतवणूक करून विदर्भात प्रकल्प उभारावे.असे गडकरी म्हणाले आहेत. नागपूर येथे एडवांटेज विदर्भ या उद्योजकीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना त्यांनी विदर्भातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांना सल्ला देताना म्हटले की शासनाच्या भरवशावर उद्योजकांनी राहुल राहू नये.त्यांनी शासनाला विषकन्या असे संबोधून म्हटले की,शासन कोणत्याही पक्षाचे असो, उद्योजक ज्यांच्यावर अवलंबून असतात,त्यांना नंतर अनुदान आणि आश्वासनांची पुर्तता होत नाही,त्यामुळे उद्योजकांचा नुकसान होऊ शकतो.

गुंतवणुकीसाठी खूप प्रयत्न पण अपेक्षित यश मिळत नाही.

उद्योजकांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले की सध्याची स्थिती अशी आहे की राज्यात उद्योगांना सरकारी अनुदान मिळेल किंवा नाही हे थेट सांगता येणार नाही. गडकरी यांच्या मते लाडकी बहिण योजनेत पैसे देण्यात येत असल्याने शासनाच्या तिजोरीवर ताण आहे. त्यामुळे उद्योजकांनी अनुदानावर अवलंबून राहू नये. राज्यात सरकारकडून लाडकी बहीण योजनेवर मोठा खर्च केला जात आहे त्यामुळे उद्योजकांना आणि उद्योगांना अनुदान मिळणार याची काहीच शाश्वती नाही. मागील अनेक वर्षांपासून विदर्भात मोठे उद्योग आणि प्रकल्प आणण्यासाठी आणि यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासाठी खूप प्रयत्न सुरू आहेत,पण याला अपेक्षित असे यश मिळताना दिसत नसण्याची खंत व्यक्त केली.

गडकरी यांच्या मते विदर्भात किती महत्त्वपूर्ण प्रकल्प रखडले.

या उद्योजक सेमिनार मध्ये विदर्भातील प्रकल्प आणि उद्योगांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे भाष्य करताना म्हटले आहे की, सध्या विदर्भात फार कमी गुंतवणूक होत आहे.त्यामुळे या भागातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प गुंतवणूक अभावी रखडले आहेत. विदर्भात उद्योग आणि प्रकल्पात झालेल्या गुंतवणुकी बाबत बोलताना गडकरी यांनी म्हटले की सध्याची स्थिती अशी आहे की विदर्भात कोणीही पाच हजार कोटींची गुंतवणूक उद्योगांवर किंवा प्रकल्पांवर करण्यासाठी तयार नाही. ज्ञान मध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत.

पण अनेक उद्योजकांनी खूप अवधी झाल्यानंतरही ज्ञान मध्ये आपले युनिट सुरू केलेले नाहीत हे असे कारण आहेत ज्यामुळे विदर्भात औद्योगिक विकासात अडथळे निर्माण होत आहे. नेमक्या याच वेळी गडकरी यांनी उद्योजकांना विदर्भात आपला उद्योग सुरू करण्यासाठी सल्ला देताना म्हटले की त्यांनी शासनाचे अनुदान किंवा इतर कोणतीही मदत किंवा सध्या अवलंबून राहू नये.स्वतःच्या भांडवल आणि गुंतवणूक वर जोर द्यावा.शासनाची उद्योग उभारण्याची सिस्टीम आणि याचे नियम हे उद्योगांसाठी नेहमी अडचणीचे ठरतात, त्यामुळे विदर्भात उद्योग शाश्वत असावा याकडे उद्योजकांनी लक्ष द्यावे असा सल्लाही त्यांनी दिला.

लाडकी बहीण योजनेवर मोठा निधी होतोय खर्च.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण ही महत्वकांशी योजना आहे. याच्यावर सरकारला मोठा निधी सध्या खर्च करावा लागत आहे,त्यामुळे इतर अनेक योजना किंवा उद्योग वाढण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान निधीत घट होत आहे.अशा परिस्थितीत उद्योगांना शासनाची मदत मिळेल याची वाट न पाहता उद्योजकांनी स्वतःच्या साधनसंपत्तीवर निर्भर राहूनच पुढे पाऊल घेणे गरजेचे आहे.

विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी हे उपाय दिले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी विदर्भात औद्योगिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीची गरज असल्यावर जोर देताना ते म्हणाले की,उद्योग, प्रकल्पात गुंतवणूक करणारे उद्योजकांचे विदर्भाकडे आकर्षण कमी आहे, त्यामुळे उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून प्रकल्प करावे असा सल्ला त्यांनी दिला. विदर्भात मीहान यांसारखे प्रकल्प आहे,पण येथे अपेक्षेनुरूप विकास साधता आला नाही.येथे उद्योजकांनी जमिनी खरेदी केल्यानंतर ही आपले प्रोडक्शन युनिट सुरू केले नाही.यावर त्यांनी खंत व्यक्त केली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seventeen − 9 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.