Ration Card : पुरवठा विभागाचे हेलपाटे घेता का? मग घरी बसूनच काळा आता आपला रेशन कार्ड.

Ration Card : पुरवठा विभागाचे हेलपाटे घेता का? मग घरी बसूनच काळा आता आपला रेशन कार्ड.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सरकार गरीब मध्यमवर्गीयांसाठी अन्नधान्य वाटपाचा नियोजन करते, मात्र यासाठी रेशन कार्ड बनवावा लागतो. मग  प्रशासनातील तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागात चक्कर काटून ही जर तुमचा रेशन कार्ड बनत नसेल तर अनेक नागरिक वैतागून जातात. मात्र आता रेशन कार्ड आपण घरी बसून सुद्धा बनवू शकतो यासाठी आपण ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये ॲपवरून रेशन कार्ड साठी अर्ज करून कार्ड बनवू शकणार आहात. एका ॲपच्या मदतीने कोणतेही आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करून रेशन कार्ड संबंधित सर्व सुविधा यातून मिळणार आहे.

असे बनवा आपले रेशन कार्ड.

भारतात शासनाकडून करण्यात येणारा रेशन कार्ड हा प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा दस्तऐवज आणि शासकीय प्रवाह असतो. वेळोवेळी याला अपडेट करण्यासाठी प्रयत्न करावे लागते सोबतच सर्वसामान्य नागरिकांना तहसील आणि पुरवठा विभागातून आपले रेशन कार्ड मिळविण्यासाठी चक्रम माराव्या लागतात. पण आता कोणीही आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वरून रेशन कार्ड मध्ये आपले ऑनलाइन पद्धतीने नाव जोडू शकणार आहे, सोबतच रेशन कार्ड मधून नावेही कमी करता येईल. यासाठी सरकारने एक विशेष मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. त्यामुळे आता सर्वांना रेशन कार्ड बनविणे नाव जोडणे किंवा कमी करणे सोपे जाणार आहे.

हा आहे तो ॲप.

रेशन कार्ड बनवण्यासाठी शासनाकडून आता मेरा राशन 2.0 हे ॲप बनवली असून याला गुगल प्ले स्टोअर मधून कोणीही डाउनलोड करू शकेल.याच्यामध्ये रेशन कार्डशी संबंधित सर्व सेवा आणि सुविधा प्राप्त होणार आहेत. नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचून घर बसल्या रेशन कार्ड बनवणे या माध्यमातून सोपे होणार आहे.Mera Ration 2.0 च्या मदतीने कुणीही  रेशनकार्ड संबंधित काम करू शकेल. यामुळे आता शासकीय कार्यालयात घीरट्या घालण्याची आणि धावपळ करण्याची गरज राहणार नाही सोबतच कुणालाही यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.

अनेक फिचर्स आणि सुविधा एप  मधून मिळणार

रेशन कार्ड साठी सरकारने बनवलेल्या मेरा राशन कार्ड 2.0 मध्ये अनेक फीचर्स असेल यातून रेशन कार्ड संबंधित माहिती मिळेल. याच्या एका फीचर्स मध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती फॅमिली डिटेल्स मध्ये भरू शकणार,सोबतच नवीन नाव. भरणे, गरज नसेल तर जुने नाव हटवता येईल तर रेशन इन टायटलमेन्ट मध्ये कुटुंबाला एकूण आणि सदस्यानुसार किती राशन मिळते याची माहिती सुद्धा मिळणार आहे. ॲप मधून ऑनलाईन अर्ज करताना ट्रॅक माय रेशन या फिचर मधून आपल्या रेशन कार्ड धान्य डीलर पर्यंत पोहोचले आहे किंवा नाही याची सुद्धा माहिती मिळणार आहे. तर माय ग्रीव्हियस या पिक्चर मधून रेशन कार्ड संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी नागरिक या पर्यायाचा वापर करू शकतील सेल रिसिप्ट रेशन घेतल्यानंतर जे पावती मिळते ती जर डीलर करून मिळत नसेल तर आता ती पावती ऑनलाइन सुद्धा कोणीही रेशन कार्ड घेऊ शकणार आणखी एका फीचरमध्ये बेनिफिट्स रिसिव्ह फ्रॉम गव्हर्मेंट यातून रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या लाभाची माहिती सर्वांना मिळू शकेल, नियर बाय एफपीएस शॉप्स या ॲपद्वारे जवळच्या रेशन कार्ड डीलर ची माहिती सुद्धा मिळणार आहे.तर सरेंडर रशन कार्ड फीचर्स मधून जर कुणाला रेशन कार्ड बंद करावयाच्या असेल तर हा फीचर रेशन कार्ड बंद करण्याची सुविधा देईल. सोबतच रेशन कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करावयाचे असेल तर यासाठी ट्रान्सफर माय रेशन कार्ड ही सुविधा अँप मध्ये असेल.

अशी बघा आपल्या रेशन कार्ड ची माहिती ॲपवर.

मेरा राशन 2.0 या ॲपवर नागरिकांना आपल्या रेशन कार्ड संबंधात माहिती बघावयास मिळेल. सर्वात आधी
गुगल प्ले स्टेशन वरून Mera Ration 2.0 डाउनलोड करावा लागेल या एपच्या होम पेजवर Mera Ration 2.0 शोधावे लागेल. आता तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. यानंतर मोबाईल डिस्प्ले वर डॅशबोर्ड उघडेल यात नागरिकांना रेशन कार्ड संबंधात यात दिलेल्या ऑनलाइन सुविधा दिसेल. यावर आवश्यक माहिती टाकून रेशन कार्ड संबंधात पुढील कारवाई होईल. विशेष म्हणजे या ॲप मध्ये दिलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नागरिकांना रेशन कार्डशी जुळलेल्या सुविधा आणि लाभ घ्यायचा आहे, त्यावर क्लिक करून आपल्या रेशन कार्ड चे क्रमांक किंवा नवीन रेशन कार्ड बनविण्यासाठी आवश्यक माहिती आणि दस्तावेजांची फोटोकॉपी टाकावी लागणार यानंतर सबमिट ऑप्शन क्लिक केल्यावर या संबंधात माहिती मिळेल.

ही कागदपत्रे लागणार?

घरबसल्या रेशन कार्ड बनवण्यासाठी ॲपचा वापर करताना नवीन कार्ड बनविण्यासाठी तहसील कार्यालय आणि पुरवठा मध्ये जे जरुरी कागद लागतात ते आवश्यक दस्तावेज,या ऑनलाइन ॲप मध्ये टाकणे जरुरी असेल. यासाठी ओळखपत्र या पॅन कार्ड मतदान कार्ड रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट विज बिल किंवा टेलिफोन बिल मतदार कार्ड कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन प्रमाणपत्र, एफिडेट आणि चौकशी अहवाल लागतील.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

twenty − 11 =