युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू!

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)*

बाळापुर अकोला मार्गवरील घटना.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

खेट्री येथील युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू.

पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथील युवकाचा बाळापूर अकोला मार्गावरील कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. ३ एप्रिल रोजीच्या दुपारी घडली आहे. गोपाल मेसरे ३७ असे मृतकाचे नाव आहे. मृतक गोपाल मेसरे बाळापुरहुन अकोला कडे एम एच ३० व्हाय ८०९० क्रमांकाच्या दुचाकीने अकोला कडे जात असताना अकोल्याहून बाळापुर कडे येणारी एम एच १२ जी के ४०६२ क्रमांकाच्या कारने जबर धडक दिल्याने गोपाल मेसरे हा गंभीर झाला.

काही लोकांनी त्याला गंभीर अवस्थेत ऑटोने अकोला येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, घटनेची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि दुचाकी व कार पोलीस स्टेशनमध्ये जमा केले असून, पुढील तपास बाळापुर पोलीस करीत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eight − 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.