डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दणक्यात साजरी करा – Dr Niraj Waghmare

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दणक्यात साजरी करा – Dr Niraj Waghmare

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

दि.१४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका जिल्ह्यात जी आचारसंहिता लागू झाली त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये व जयंती मंडळामध्ये एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आचारसंहिता लागू असताना आंबेडकर जयंती कशी साजरी करायची? याबाबत अनेक मत-मतांतरे देखील दिसून आले. जयंती उत्सव मंडळांनी नेमकी परवानगी कोणाची घ्यायची?

जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार की पोलीस प्रशासन हा सामाजिक मंडळामधला गोंधळ निदर्शनास येताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष Dr Niraj Waghmare यांनी तातडीने दिनांक १९ मार्चला मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना निवेदन देऊन हा संभ्रम दूर करण्याची विनंती केली. आणि आचारसंहितेमध्ये जयंती साजरी करण्याचे नेमके दिशा निर्देश काय आहेत? ते  जारी करण्याची मागणी केली. त्यानुसार मा.जिल्हाधिकारी कार्यालयाने दि.२३ मार्चला मा. अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीला रीतसर पत्र देऊन दिशा निर्देश कळवले आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी कार्यकर्ते व जयंती मंडळांनी आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबतचा जो संभ्रम होता तो पूर्णपणे दूर झालेला आहे.नेहमीप्रमाणे केवळ पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेऊन जयंती उत्साहात आणि दणक्यात साजरी करावी याबद्दल वंचित बहुजन आघाडी कडून आश्वस्त करण्यात येत आहे. तसेच जयंती संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास थेट वंचित बहुजन आघाडीला संपर्क करावा.

यावेळी जिल्हा महासचिव मा.शिवदास कांबळे, (यवतमाळ) तालुकाध्यक्ष, प्रफुल शंभरकर, गुणवंत मानकर, धम्मवतीताई वासनिक, अध्यक्ष महिला आघाडी,महासचिव-पुष्पाताई शिरसाठ, उपाध्यक्षा-मीनाताई रणीत, सचिव-आरती सावते,निशा निमकर, सुकेशिनी खोब्रागडे, प्रमोद पाटील, निलेश मनवर,अनिल सोनारकर, राजू गवळी, बाबू गजभिये, सचिन मेश्राम, बिट्टू वानखडे, अमर पाईकराव इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आपला हक्काचा माणूस डॉ.नीरज वाघमारे – जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी यवतमाळ.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 17 =