Elections 2024: लोकसभा निवडणूकित शेतकरी संघटनेची भूमिका ठरणार निर्णायक.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*

Elections 2024: चंद्रपूर -आर्णी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग आता फुंकले जात असुन नुकतेच भाजपातर्फे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव जाहीर झाले आहे. दुसरीकडे काँग्रेस तर्फे आमदार प्रतिभा ताई धानोरकर तथा शिवानी वड्डेटीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीचा अंदाज लक्षात घेता याही निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेच्या मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

गेल्या 40 वर्षापासून राजुरा मतदारसंघ शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला मानला जातो. यासोबतच ॲड.वामनराव चटप यांना दोन दा लोकसभेत मिळालेल्या मतांची संख्या बघता इतरही विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेची मते दिसुन येते. शेतकरी संघटनेचे नेते विदर्भवादी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांचा जनसंपर्क विविध आंदोलन आणि शेतकरी संघटनेशी एकनिष्ठ नाते व प्रामाणिकता यामुळे मतदारांमध्ये आजही त्यांची पकड आहे.

त्यामुळे शेतकरी संघटनेच्या मताचं मूल्य याही निवडणुकीत वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळ्या विदर्भ राज्य मिळवून देऊ अशी घोषणा केली मात्र यात सत्ता येताच विदर्भप्रेम विसरले. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडूनही वेगळ्या विदर्भासाठी पाहिजे त्या प्रमाणात समर्थन मिळालेले नाही. राजुरा मतदारसंघात काँग्रेस शेतकरी संघटना थेट लढत नेहमीच असते.त्यामुळे चटप काय निर्णय घेतात याच्यावरती लोकसभेचे गणित अवलंबून राहणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

1 × 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.