बाभुळगाव तालुक्यात क्रीडा संकुलन देण्याची मागणी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*

युवा संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

बाभूळगाव तालुक्याच्या ठिकाणी मोठे व अद्ययावत असे क्रीडासंकुल खेळाडूसाठी व विद्यार्थ्यांसाठी सराव करण्याकरीता निर्माण करावे, या मागणीचे निवेदन तालुका क्रीडा संकुल युवा संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार यांना दि. 7  मार्च रोजी दिले आहे. 64 ग्राम पंचायती विस्तार असलेल्या  बाभूळगाव तालुक्याला विस्तीर्ण असा परिसर लाभला असून लोकसंख्या बाबतीत तालुका मोठा आहे.

तरीही या ठिकाणी खेळाडूसाठी हक्काचे क्रीडा संकुल करण्यात आले नाही. तालुक्यात क्रीडासंकुल देण्यात यावे यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले . परंतु साधी दखलही घेण्यात आली नाही.यावरून येथील लोकप्रतिनिधी व शासनाची उदासीनता दिसून येते.येथे प्रतिभावंत स्पर्धकांना आता नितांत सरावासाठी क्रीडांगणाची गरज आहे. तालुक्यात विद्यार्थाना सराव करण्यासाठी कोणतीही सोय नाही.

त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहे. कुठेही अंधारात किंव्हा महामार्गावर रनिंग करावी लागत असल्याने ते धोकादायक आहे. तालुक्यात त्वरित क्रीडा संकुलाचा देण्यात यावा जेणे करून तालुक्यात क्रीडा संकुल झाल्यास शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सराव करता येईल, अशी युवा संघर्ष समिती व विद्यार्थाची व मागणी आहे. निवेदन देते वेळी अक्षय राऊत, प्रज्वल राऊत, निखील गाडगे, विक्रम कोंबे, वैभव जयपूरकर, शुभम इंगोले, अमेय घोडे, प्रविण सपकाळ, स्वप्निल वानखडे, ललीत मुन, अजय राठोड, रितीक शिंदे, अनिकेत गावंडे,अंकुश सोयाम, प्रदीप नांदुरकर, स्नेहल दिघाडे आदि उपस्थित होते.

आमदाराने तिन वेळा क्रीडा संकुल प्रस्ताव दाखल केला  परंतु  शहरात शासकीय जागेअभावी रडखला  असून, दिघी क्र.2 मधील  जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी पाहणी केली असुन जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी या जागेची मोजणी करण्याकरिता भुमि अभिलेख कार्यालयाला पत्र दिले आहे.
– अनिकेत पोहकार, भाजपा बाभुळगाव शहर अध्यक्ष

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

6 − four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.