Marathi Rajbhasha Din साजरा!

Marathi Rajbhasha Din साजरा!

*दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Marathi Rajbhasha Din : स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय बोरी अरब येथे मराठी भाषा व वाड्मय मंडलाच्या वतीने मराठी भाषा राजभाषादिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कवी प्रा. कवडू राठोड सर उपस्थित होते. तसेच मंचावर आय.क्यू ए.सी.समन्वयक डॉ.असरार खान तर अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप खुपसे हे उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. राठोड सर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा आढावा घेऊन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या कुसुमाग्रज यांचा आलेख विद्यार्थ्यांसमोर ठेवला. तसेच डॉ. खान सर यांनी साहित्य व साहित्यिकांचे वेगळेपण विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच विद्यार्थिनी कु. प्रीती गायकवाड हिने आपल्या खुमासदार शैलीत कुसुमाग्रज यांच्या कवितेचा अर्थ उलगडून दाखविला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.खूपसे सर यांनी आपल्या ओघावत्या शैलीत मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नंदकुमार भाकरे यांनी तर उत्कृष्ट सूत्रसंचालन कुं. आरती वानखेडे बी. ए. भाग 3 तर आभार कु. हर्षदा पराते बी. ए.भाग. 3 या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य यांनी केले.

यामध्ये कु. साक्षी ठाकरे, भावेश ढोमने प्रज्वल वासनिक, कु प्रीती गायकवाड, कु आरती खंदारे यांचा प्रामुख्याने समावेश होता. कार्यक्रमाला डॉ. सुजाता नाईक, प्रा. आकाश सूर्यवंशी, प्रा. नयन पुरी व समस्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + two =