Vasantrao Chavan: नायगांव चे चव्हाण कोणाचे आशोकरावांचे अन्य पक्षाचे.
*नायगांव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*
माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण याना आदर्श मुळे काँग्रेस चा हात सोडुन भाजपचे कमळ हातात घ्यावे लागल्याने त्यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले नायगांव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वंसतराव चव्हाण कोणत्या पक्षात जाणार की काँग्रेस मध्ये राहणार हे स्पष्ट झाले नसल्याने त्यांच्या भुमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राजकारणात कधी ही काही होऊ शकते हे आता खरच ठरत आहे.मी काँग्रेस सोडणार नाही म्हणा-या माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण यांना आदर्श मुळे भाजप मध्येप्रवेश करावा लागला.
नायगांव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस माजी आमदार Vasantrao Chavan हे आशोक चव्हाण याचे निकटवर्तीय म्हणून नांदेड जिल्हयात ओळखले जाते. आशोक चव्हाण यांच्या सोबोत आनेक काँग्रेस चे आजी आणि माजी आमदार भाजप सोबत गेले पण नायगांव चे वंसतराव चव्हाण यांनी दोन दिवस झाले तरी त्यांनी काँग्रेस मध्ये राहणार की आशोक चव्हाण सोबोत भाजप मध्ये जाणार हे आद्याप स्पष्ट केले नसल्याने नायगांव मतदार संघातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
नायगांव विधानसभा मतदार संघात माजी आमदार वंसतराव चव्हाण यांना म्हणारा मोठा जनसमुदाय आहे. दोन वेळा आमदार म्हणून त्यांनी या मतदार संघात काम केले आहे. माजी आमदार वंसतराव चव्हाण यांच्या भुमिकेडे जनतेचे लक्ष लागले आहे. नायगांव विधानसभा मतदार संघात माजी आमदार चव्हाण यांची वैयक्तिक ताकद मोठी आसल्याने ते येणा-या काळात कोणती भुमिका घेणार या कडे मतदार संघातील नागरिकांची लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण यांनी वंसतराव चव्हाण यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची माळ घातली त्यांनी आडीच वर्ष जिल्हा बॅकेचे काम सांभळले काही कारणामुळे पदभार सोडावा लागला. येणा-या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाकडुन माजी आमदार वंसतराव चव्हाण हे उमेदवार राहतील की त्यांचे सुपत्र राहतील हे पाहणे उत्सुकयाचे ठरेल.
नांदेड जिल्हयात आशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने जिल्हयात तालुक्यात फाटक्या अतिश बाजी, बॅनर्स लाऊन चव्हाण सर्मथक स्वागत करित आसताना नायगांव मध्ये मात्र आशोक चव्हाणाच्या भाजप प्रवेशाचे फटाके मात्र वाजले नसल्याने माजी आमदार वंसतराव चव्हाण आशोक चव्हाण सोबत की अन्य पक्षात जाणार आशीच चर्चा नायगांव तालुक्यातील चालु होती. आद्याप ही वंसतराव चव्हाण यांनी आपली भुमिका स्पष्ट केली नसल्याने नायगांव विधानसभेची उमेदवारी जो पक्ष देईल त्या पक्षात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
एकाच पक्षात सर्वच गेले तर उमेदवारी कशी मिळेल या भितीने राजकीय पुढारी वेट अॅण्ड वाॅच च्या सावध भुमिकेत आसल्याचे समजते. आशोक चव्हाण मुख्यमंत्री होताना बिनशर्त पांठीबा माजी आमदार वंसतराव यानी दिला होता. तेव्हापासून त्याचे आशोक चव्हाण यांच्या सोबत चांगले संबंध निर्माण झाले आणि आशोक चव्हाण ना ही नायगांव मतदारसंघात वजनदार नेतृत्वाची गरज होती. माजी आमदार वंसतराव चव्हाण यांच्या राजकीय भुमिकेकडे जिल्यासह नायगांव विधानसभा मतदार संघाचे लक्ष लागले आहे.