Ashram Shala: आश्रम शाळेची माहिती देण्यास टाळाटाळ संस्थेमध्ये गौडबंगाल असल्याची शक्यता!
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
दारव्हा तालुक्यातील कुंभारकीन्ही पुनर्वसन समोर असलेल्या राजर्षी शाहू महाराज विजा भज माध्यमिक Ashram Shala असून सदर संस्थेकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज करून माहिती मागितली असता जन माहिती अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी विहित मुदतीत माहिती न पुरविल्यामुळे गटशिक्षणाधिकारी दारव्हा यांचे कडे अपील दाखल करून गटशिक्षणाधिकारी दारव्हा यांनी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेऊन माहिती पुरविण्याचे आदेश देऊनही संबंधित जन माहिती अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी माहिती न दिल्यामुळे संस्थे मध्ये खूप काही गौडबंगाल असल्याचे दिसून येत आहे.
सदर संस्था मागील अनेक वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात असून सदर संस्थेने शाळेचे ठिकाण अनेकदा बदलविले आहे या ठिकाणी असलेली विद्यार्थी संख्या सुद्धा हजेरीपटावर वेगळी आणि प्रत्यक्षात मात्र वेगळे अशीच परिस्थिती दिसून येत आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत लेखापरीक्षणा अहवाल लेखा आक्षेपाच्या छायांकित सत्यप्रती विद्यार्थ्यांची नावासह वर्गाप्रमाणे यादी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी इत्यादी माहिती मागविण्यात आली होती.
परंतु जन माहिती अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे संस्थे मध्ये बरेच काही गौड बंगाल असल्याचे जाणवत आहे सदर प्रकरणाची माध्यमिक शिक्षण विभागाकडून कसून चौकशी झाल्यास फार मोठे घबाड बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.
गट शिक्षण अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली.
गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती दारव्हा यांनी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पत्र काढून आदेश जारी केला होता त्या आदेशामध्ये जन माहिती अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी माहिती दिल्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांचे आदेशाची अवहेलना झालेली आहे.