ओबीसी नेते Adv Avinash Bhosikar यांचा नरसी येथे सत्कार.

*नायगांव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*

ओबीसी आंदोलनाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ओबीसी बहुजन मोर्चा या स्वतंत्र पक्षाची घोषणा केली.यात नरसी येथे परवाच झालेल्या ओबीसी मेळाव्याचे आयोजक Adv Avinash Bhosikar यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी दिली. लोकसभा निवडणुकी अगदी जवळ आल्या असल्याने प्रत्येक पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित करणे मताची गणिते जुळवण्यात व्यस्त आहेत.तर प्रकाश अण्णा शेंडगे यांनी अविनाश भोसीकर यांची नांदेड लोकसभा ची उमेदवारी जाहीर केली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्याचे औचित्य साधून नरसी येथील ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते कैलास पांचाळ यांच्या वतीने आज नरसी येथे भोसीकर आले असता चौकात फटाक्याची आतषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले. सत्करा नंतर शासकीय विश्राम ग्रह नरसी येथे बैठक घेऊन अविनाश भोसीकर, ओबीसी जन मोर्चा चे जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुंडे,साईनाथ कांबळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कैलाश भिमराव पांचाळ,सुभाष चुट्टेवाड,बालाजी कोकणे,शामसुंदर बोधने, अस्लम पटेल,मारोती मेटकर,विश्वंभर कांबळे,किशन इरेवाड, चांदपाशा सय्यद,अनिल बोधणे,प्रकाश तुप्पेकर, यल्लपा पवार,गंगाधर नरसिकर,शंकर नरसिकर,उमाकांत बोधणे,किशोर जानोरे,बबलू सय्यद, विद्याधर कांबळे, शुभम भेदे,गणेश कोत्तेवार,अहमद शेख,विजय सूर्यवंशी, यांच्या सह ओबीसी बहुजन मोर्चा चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे आयोजन व सूत्रसंचालन सचिन भेदे यांनी केले तर आभार इमरान सय्यद यांनी केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 × 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.