*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)*
सुगंधीत प्रतिबंधीत तंबाकू व पानमसाला वाहतुक महिंद्रा बोलेरा पिकअप आसा एकून २३,६६,३१५/- चा मूदूदेमाल जप्त.
Pusad Crime: दिनांक ०४/०२/२०२४/- रोजी रात्री पोलीस स्टेशन हदूदीतून प्रतिबंधित सुगंधीत तमाखु,गुटखा व पानमसाला याची दारव्हा,कारंजा आशी वाहतूक जात असल्याची गोपनीय खबर पोलीसांना मिळाल्याने त्याबाबत मा सहायक पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री पंकज अतुलकर साहेब यांना माहिती देवून त्यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन पुसद शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर पोलीस उपनिरीक्षक शंरद लोहेकर हे डी, पी स्टाफ सह रवाना होवून, मिळाले माहिती प्रमाणे सापळा रचून कारवाई केली.
असता दिनांक ०५/०२/२०२४/- रोजी रात्री ००,३० वा पुसद इंदिरानगर येथील हनुमान मंदिराचे समोर रोडवर माहूर बाजूकडून पुसद कडे येणारी महिंद्रा बोलेरा पिकअप क्रमांक, एम, एच,२६/ बी ई ६०७६ हिस ताब्यात घेवून ड्राइवर नामे शेख जावेद शेख हबीब वय २९ वर्ष राहानार फुलसावंगी तालुखा माहागाव जिल्हा यवतमाळ याचेकडे चैकशी करता सदर गाडीमध्ये प्रतिबंधित सुगंधीत तमाखु गुटखा व पानमसाला असल्याचे निष्पन झाल्याने सदर गाडी ताब्यात घेवून पोलीस स्टेशन आवारात लावून त्याबाबत मा श्री अमित कुमार अशोक कुमार उपलय, अन्न व आ औषध प्रशासन अधिकारी यवतमाळ महाराष्ट्र राज्य यांना माहिती देवून त्यांनी सदर पिकअप मधील माल चेक केला.
असता त्यामध्ये एकूण १५,६६,३१५, रूपय किमती चा प्रतिबंधित सुगंधीत तमाखु गुटखा पानमसाला व किमत रूपए ८०००००/- ची महिंद्रा बोलेरा पिकअप आसा एकून २३,६६,३१५/- रूपय चा मूदूदेमाल जप्त करून त्यांनी दिले फिर्यादी वरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक ४३/२०२४ कलम ३२८,२७३,२७२,१८८, व भा, द,, वी,सहकलम २६(२)( आय),२६(२)( ई),३०(२)( ऐ),५९ अन्य सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रमाणे आरोपी नामे १) शेख जावेद शेख हबीब वय २९ वर्ष राहनार फुलसावंगी तालुखा माहागाव जिल्हा यवतमाळ यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
असुन तपासांत आरोपी नामे २) शेख शोहेब शेख खुर्शीद राहनार फुलसांवगी तालुखा माहागाव जिल्हा यवतमाळ ३) महमूद अली खान गुलाम रसूल खान राहनार दारव्हा ४) फिरोज पुंजानी राहनार मस्जीदपुरा कारंजा असे आरोपी निष्पन झालेले आहेत त्यापैकीऊ शेख जावेद शेख हबीब वय २९ वर्ष राहनार फुलसावंगी तालुखा माहागाव जिल्हा यवतमाळ व महमुद अली खान गुलाम रसूल खान वय ४३ वर्ष राहनार रहेमतनगर दारव्हा यांना अटक करण्यात आले आहे सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शंरद लोहेकर पुसद शहर स्टेशन हे करित आहेत.