ताकबीड येथील सरपंच ग्रामसेवक यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह,गरजूंना घरे देण्याऐवजी चुकीच्या लाभार्थ्यांची यादी केली सादर.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*

नायगाव तालुक्यातील मौजे ताकबीड येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी स्थानिक गाव पातळीवर मोदी आवास योजनेची व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना पक्के घराची आवश्यकता असतानां त्यांना डावळून बोगस लाभार्थ्यांची यादी तालुका पातळीवर सादर केल्याने हे गावातील राजकीय द्वेषा पोटी केली आहे असा आक्षेप घेऊन खरे लाभार्थी यांनी सदर यादी रद्द करण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे ताकबीड येथील घरकुलाचे खरे लाभार्थी संभाजी किसन मंडलापुरे हनुमंत इरबा मंडलापुरे राधाबाई किशन मंडलापुरे यांची काही दिवसापूर्वी घरे जळून खाक झालेली आहे त्यांचे कुटुंब आज उघड्यावर पडलेले आहेत कसाबसा निवाराकरुन ते तोडक्या मोडक्या कच्च्या घरामध्ये आजही राहतात पण सरपंच व ग्रामसेवक यांनी अगोदर यांना प्राधान्य द्यायला पाहिजे होती.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

परंतु गावातील राजकीय द्वेषा पोटी या खऱ्या गरजू लाभार्थ्यांना डावण्यात आले आणि आपल्या जवळचे कोण यांची खात्री करून पक्क्या घर धारकांनाच पुन्हा घरकुल देण्यासाठी प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविण्यात आला असे करणं म्हणजे सरपंच ग्रामसेवक यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह येणारच कारण 194 घरकुल लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली 25 जानेवारी 2024 रोजी विस ते पंचवीस जनाची निवड केली त्यातील काहींना पक्के घरे आहेत असे निवेदनात नमूद केले आहे.

गाव पातळीवर गरजू लाभार्थ्याविषयी सुडाचे राजकारण नसावे सर्वांकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखा असावा आणि खऱ्या गरजू लाभार्थ्यांना अगोदर प्राधान्य द्यावे म्हणून तालुका पातळीवरील वरिष्ठ अधिकारी यांनी खऱ्या गरजू लाभार्थ्यांची अगोदर गाव पातळीवर जाऊन पाहणी करावी आणि घरकुलाचा लाभ द्यावा अन्यथा आम्ही न्यायासाठी उपोषण करण्याच्या भूमिकेत आहोत अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनावर लाभार्थी सतीश दिगंबर टेकाळे, अशोक नरसिंगा पांचाळ, संभाजी किशन मंडलापुरे, रामदास संभाजी कुरे, विठ्ठल नरसिंग पांचाळ, ज्ञानेश्वर विठ्ठल टेकाळे, शिवाजी रामदास पांचाळ, ज्ञानेश्वर विठ्ठल गंगातीरे, हनुमंत इरबा मंडलापुरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 × five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.