पुसद येथील रिंग रोड साठी ४८ कोटी ६४ लाख रुपये मंजूरी.
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)*
खासदार भावनाताई गवळी व आमदार निलय नाईक पुसद यांच्या प्रयत्नांना यश गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली पुसद येथील रिंग रोड ची समस्या निकाली निघाली आहे. खासदार भावनाताई गवळी व आमदार निलेय भाऊ नाईक पुसद यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर केली आहे या रिंग रोड मुळे शहराच्या आर्थिक चेहरा मोहरा बदलून जाणार आहे.
२४ कि.मी. च्या रिंग रोड साठी पुसद सभेवातलाचि जवळपास ६५ हेक्टर जमीन भु प. संपादन करण्यात येणार असून यासाठी पहिल्या टप्पा ४८ कोटी ६४ लाख रुपयांची मंजूर करण्यात आला आहे शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेली पुसद करांची डोकेदुखी अखेर कमी होणार आहे त्यामुळे नव्या रिंग रोडच्या कृषी. वाणिज्य .शिक्षण. आरोग्य .विषयक सुविधांसाठी उपयोग होणार आहे.