दोन महिने उलटले तरी जमीलखान यांचा शोध लागेना, चौकशी गुलदस्त्यात.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*

अपहरण करण्यात आल्याचा नातेवाईकांचा आरोप.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

बरबडा येथील जमीलखान शादुलखान पठाण हा युवक दोन महिन्यांपूर्वी घरातून आता येतो म्हणून दुचाकीवर बसून गेला तो आजपर्यंत परत आलाच नाही यामुळे त्यांचे छोटे भाऊ अजीसखान पठाण हे कुंटूर पोलीस ठाण्यात रितसर अर्ज दाखल करून घातपात असल्याची शंका व्यक्त केली परंतु अजूनही सदर प्रकरणाचा तपास लागला नाही यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी पठाण कुटुंबाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

सदर वृत्त असे की,बरबडा येथील जमीलखान शादुलखान पठाण हे दि.०२ डिसेंबर २०२३ च्या रात्री घरातून ११:३० वा.बाहेर जावून येतो दुचाकीवरून घरातून गेला तो आजपर्यंत परत आलाच नाही यामुळे त्यांचे छोटे भाऊ अजीसखान पठाण यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात रितसर अर्ज दाखल करून मिसींगची तक्रार केली परंतु अजूनही सदर प्रकरणाचा तपास लागला नाही यामुळे जमीलखान पठाण यांचा अपहरण करून घातपात झाला असावा अशी शंका व्यक्त करत अजीसखान पठाण यांनी काही नावे उघड केली आहे.

यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून पठाण कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली असून बेपत्ता असलेल्या जमीलखान पठाण यांचे वर्णन -वय ३३ वर्ष, उंची ५ फुट ६ इंच,रंग सावळा, बांधा-सडपातळ, पायात काळ्या रंगाची चप्पल,पोशाख – निळ्या रंगाचा जिन्स पॅन्ट, काळ्या रंगाची टिसर्ट असे असून कुंटूर पोलीस ठाण्याच्या वतीने शोध पत्रकाही काढण्यात आली आहे सदर इसम कुठे आढळून आल्यास कुंटूर पोलीस ठाण्याला कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

19 − eight =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.