प्रस्तावित उमरखेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय हा निर्णय रद्द करा – पुसद वकील संघ

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)*

पुसद वकील संघाचे आज काम बंद आंदोलन.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यवतमाळ जिल्हयातील सर्वात जुन्या परिचित असलेल्या पुसद वकील संघाने आज दिनांक ८ जानेवारी 2023 रोजी न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आज संपूर्ण वकील संघाने काम बंद आंदोलन केले आहे. शासन निर्णयानुसार पुसद येथील वि. दिवाणी न्यायाधीयश व. स्तर यांचे न्यायालय तसेच वि. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उमरखेड येथे स्थानांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार उमरखेड येथे २५ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाणी न्यायाधीश व. स्तर यांचे न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.

उमरखेड व महागाव तालुक्यातील पुसद न्यायालयतील सर्व प्रकरणे त्या ठिकाणी वर्ग करण्यात आली. आता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देखील उमरखेड येथे स्थापन करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. याबाबत पुसद वकील संघाने आपली बाजू शासनाकडे मांडण्याकरिता आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. उमरखेड येथे सत्र न्यायालय स्थापन होण्यास पुसद वकील संघाचा तीव्र विरोध असून त्याबाबत पुसद वकील संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,व उपमुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहित पुसद विधानसभेचे आमदार अॅड. निलय नाईक व विधान परिषदेचे आ. अॅड. इंद्रनील नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांना न्यायालयाच्या स्थलांतराच्या विषयाचे निवेदन देण्यात आले.

असून आपली भूमिका शासन दरबारी मांडण्या करिता विनंती केली आहे त्याच प्रमाणे जिल्हा व वकील संघ सदस्पांनी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती विनय जोशी यांची यवतमाळ जिल्हा यांनी भेट घेऊन त्यांना देखील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय उमरखेड येथे स्थापन करण्यात येऊ नये नियमानुसार दोन किंवा त्यापेक्षा अतिरिक्त तालुक्यांकरिता एक सत्र न्यायालय असावे अशी तरतूद असल्याचे तसेच पक्षकारांचे हित लक्षात घेण्याबाबत निवेदन दिले होते.

परंतु पुसद वकील संघ यांचे मार्फत काल मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमांन हांडे ह्यांची भेट घेऊन पुसद वकील संघाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील व त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आज दि.सोमवार ८ जानेवारी 2023 रोजी वकील संघातील सर्व वकील संघाने पुसद न्यायालयाच्या आवारात काम बंद आंदोलन करण्यात आले जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत प्रस्तावित उमरखेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय ला विरोध दर्शवित राहणार असल्याचे वकील संघ तथा समस्त उपस्थित वकील यांनी बोलताना सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

fourteen − ten =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.