वसंत विमुक्त जाती आश्रम शाळा हरू येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

दारव्हा: दारव्हा तालुक्यातील वसंत विमुक्त जाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा हरू येथे अवधेश असेसमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या संस्थेच्या वतीने प्रशिक्षक श्री अंकुश पडोळे यांनी विद्यार्थ्यांना अनंत काळापासून पृथ्वीतलावर आपत्ती कोसळत आल्या आहेत वारंवार येणाऱ्या आपत्तीपैकी काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आपत्तीमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी किंवा त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कसे करावे यासाठी त्यांनी आपत्तीपूर्व कार्यवाही मध्ये संभाव्य धोक्याचा आढावा घेऊन त्या धोक्याची हानिकारकता आणि स्वरूपाचा आढावा घेणे, धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे तसेच आपत्ती दरम्यानच्या कार्यवाही मध्ये धोक्याचा इशारा देणे, जीविताचे रक्षण आणि बचाव कार्य करणे,लोकांना सुरक्षित स्थानी नेणे आणि तात्काळ त्यांना वैद्यकीय व इतर मदत पोहोचविणे तसेच इतरही कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी व आपत्तीतून स्वतःची व इतरांची सुटका कशी करावी.

याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकव्दारे सखोल माहिती दिली त्याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री राजेंद्र मांगे सर, आपत्ती व्यवस्थापन प्रभारी श्री दुष्यंत राठोड सर , शाळेतील शिक्षक श्री प्रकाश गोंडाणे सर ,श्री विजय काळे सर, श्री रामदास सरतापे सर ,श्री रविंद्र गावंडे सर ,श्री निलेश गलाट सर, कु. खर्चे मॅडम , श्री समीर उरगुंडे सर,श्री नामदेव चव्हाण सर , श्री स्वप्निल खाडे सर ,महिला अधीक्षिका चौधरी मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी ज्ञानेश्वर मस्के ,जितेंद्र गाडगे, पुरुषोत्तम भुते,चिंतामण पाटील , तुकाराम काळे तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

ten − three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.