*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
ट्रॅक्टरचे कर्ज फेडू न शकल्याने तरुणाची आत्महत्या.
बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथील रहिवाशि कृष्णा शंकर महाजन या तरुणाने शेतामध्ये झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. एकुलत्या एक तरुणाच्या अचानक जाण्याने गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.कृष्णा महाजन वय 25 वर्ष याने कर्जावर ट्रॅक्टर घेतले होते.
सदर ट्रॅक्टरचा हप्ता तो फेडण्यास असमर्थ होता. ट्रॅक्टरचा हप्ता कसा फेडावा या विवंचेत तो राहत होता.अशातच त्याने सोमवारला दि.११रोजी दुपारी 3.30 वाजता दरम्यान एका शेतामध्ये एका झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. अविवाहित तरुण आपल्या आई वडिलांना एकुलता एक होता. त्याच्यामागे आई-वडील असा परिवार आहे. अधिक तपास जमादार अमोल खडसे करीत आहे.