बंदर फाटा ते सखी रस्त्याचे MLA Dr. Ashok Uike नी केले भूमिपूजन.

राळेगाव: गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील बंदर फाटा ते सखी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता, या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता, ही बाब तेथील गावकऱ्यांनी वरध सावरखेडा गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यांनी ही बाब राळेगाव विधानसभेचे लोकप्रियआमदार प्रा डॉ अशोक उईके यांना सांगितली या मागणीला धरून जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत १ कोटी रुपयांचा बंदर फाटा ते सखी रस्ता त्वरित मंजूर करण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्यामुळे या रस्त्याचा भूमीपूजन सोहळा आज मंगळवार दि ५ डिसेंबर रोजी राळेगाव विधानसभेचे MLA Dr. Ashok Uike यांचा उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आला.ह्यावेळी भूमिपूजन समारंभाला माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे,माजी सभापती प्रशांत तायडे,शहराध्यक्ष डॉ कुणाल भोयर,संजय काकडे,विशाल पंढरपुरे,रंजीत ठाकरे,आशिष इंगोले,संदीप तेलंगे,दिनेश गोहणे यासह गावातील सरपंच उपसरपंच,सदस्य तसेच नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

sixteen − four =