दिघोरी ग्रामपंचायतीवर जनसेवा पॅनलचा झेंडा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

सरपंच पदी पार्वती आमटे तर उपसरपंच पदी पुरूषोत्तम राठोड.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तालुक्यातील दिघोरी वरूड इजारा ग्रामपंचायतींवर पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा पॅनलने आपले वर्चस्व स्थापन केले. जनसेवा पॅनलने आठ पैकी सात जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली. या ठिकाणी सरपंच निवड प्रक्रिया सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी निवड अधिकारी स्वप्निल मेंडे, सचिव प्रमोद धवसे यांच्या उपस्थितित निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये सरपंच पदी पार्वती बंडू आमटे यांची तर उपसरपंच पदी पुरूषोत्तम बद्रीनाथ राठोड यांची निवड करण्यात आली.

यावेळी नवर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संजिवनी विजय घोटेकर, सोनाली दिलीप भयमारे, सिताराम विठू मेश्राम, निकिता पुरुषोत्तम राठोड, प्रवीण महादेव पवार, कांता किशोर चांदेकर उपस्थित होते. यावेळी नवर्वाचित सरपंच, उपसरपंच यांनी गावकऱ्यांचे आभार मानून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी निवडणूक अधिकारी स्वप्निल मेंडे, ग्रामसेवक प्रमोद धवसे यांनी सरपंच पार्वती आमटे व उपसरपंच पुरूषोत्तम राठोड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.