बाभूळगाव सागरच्या निधनामुळे कोपरा जानकर येथील संदल कार्यक्रम रद्द.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब*

बाभूळगाव पासून जवळ असलेल्या कोपरा जानकर येथील सागर वाईकर याचे दोन दिवसांपूर्वी शेतात विद्युत शॉक लागून निधन झाल्यामुळे दरवर्षी धुमधडाक्यात काढला जाणारा कोपरा जानकर येथील मलंग शहा बाबा यांचा संदल कार्यक्रम रद्द करण्यात येऊन हिंदू , मुस्लिम एकतेचा, एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कोपरा जानकर येथील हजरत मलंग शहा बाबा यांचा दरवर्षी धुमधडाक्यात संदल कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी सदर संदल कार्यक्रम दिनांक 2 डिसेंबर रोजी आयोजित होता.

वाचा | बाभूळगाव शॉक लागून एका तरुण इसमाचा मृत्यू.

मात्र दोन दिवसा आधी गावातील युवा शेतकरी सागर वाईकर वय 31 वर्ष याचा स्वतःच्या शेतात विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोक सागरात बुडालेले असताना आपण संदल कार्यक्रम कसा करावा असा विचार अली परिवारात करण्यात आला.

यानंतर संदल कार्यक्रमाचे आयोजक सेवानिवृत्त प्राध्यापक अब्देअली कोपरेकर यांच्या आदेशान्वये संदल कार्यक्रमा करिता सांगितलेले घोडे, बँड, ढोल ताशे रोषनाइ रद्द करण्यात येऊन हिंदू मुस्लिम एकतेचा भाईचाऱ्याचा संदेश दिला गेला. रात्री महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 × five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.