* चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
भारत देशात विविध राज्यात निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कामे करणारी संघटना चळवळ अर्थात राष्ट्रीय बंजारा परिषद आहे.नुकतीच या परिषदेची राष्ट्रीय व अमरावती विभागीय कार्यकारणी जाहीर झाली आहे.
राष्ट्रीय बंजारा परिषदेचे समन्वयक किसनभाऊ राठोड १२ भक्तीधाम निर्मिती करणारे यांच्या संकल्पनातून संघटना मोठ्या प्रमाणात वाढवावी याकरिता नेतृत्वास राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयकुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजात नाय हक्क लढण्यासाठी संघटना वाढवण्यासाठी,राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या अमरावती विभाग अध्यक्षपदी नियुक्ती देऊन बंजारा समाजाचे जनसेवा मानव प्रतिष्ठान च्या माध्यमातून महाराष्ट्रभर ओळख निर्माण करणारे, रुग्ण सेवक, दारव्हा तालुक्यातील युवा कार्यक्षम युवा नेतृत्व श्याम राठोड यांची निवड झाली आहे.
अमरावती विभाग मधील जिल्ह्यातील तालुका ठीकानी सर्व तांड्यात जाऊन संघटना वाढविण्याचा प्रयत्न राठोड हे करतील अशी भूमिका घेऊन आपल्या पद अर्पण निवड केली यां निवडीमुळे समाज जिल्यात नवे तर तालुक्यात समाज बांधवांच्या माध्यमातुन त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव भरसत आहे.