राऊत सावंगी येथे अवैध रेती उपसा प्रकरण.

राऊत सावंगी येथे अवैध रेती उपसा प्रकरण.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

कारवाही केलेली रेतीची विल्हवाट लावणे पडले महागात.

एसएमएस कंपनीच्य  ठोठावला तब्बल24लाखांचा दंड.

तालुक्यातील राऊत सावंगी येथे महसूल विभागाने अवैध रेती उत्खननावर कारवाई करण्यात आली होती. हे उत्खनन एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लि. नागपूरची कंपनीने केल्याची बाब समोर आली होती. – त्यावरून कंपनीला महसूल  विभागाने २३ लाख ८४ हजार  ३५ रूपयांचा दंड ठोवला आहे.

या बाबत लेखी आदेशाद्वारे एसएमएस कंपनीच्या व्यवस्थापकास कळवण्यात आले असून, दंड भरण्यास ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. कुठलाही कायदेशीर परवाना नसताना गौण खनिजांची वाहतुक करीत असल्याने व गौण खनिजांची विल्हेवाट लावण्याच्या उद्देश बाळगल्याने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ पोट कलम ७ व ८ (१) (२) मधील तरतूद तसेच महाराष्ट्र जमीन महसुल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम १९६८ मधील तरतुदीनुसार दंड आकारण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.

 

दि. ९ नोव्हेंबर रोजी राऊत सावंगी  वर्धा नदी पात्रातून अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करीत असलेले ३ पोकलेन मशीन, ६ ब्रास रेती साठा बाभूळगाव महसूल विभागाने जप्त केला होता.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × five =