दारव्हा : संगणक परिचलकांचे पंचायत समिती समोर एक दिवसीय धरणे आंदोलन.

*दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

विविध मागण्यासाठी ०८/११/२०२३ पासून राज्य भर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे यामुळे ग्रामपंचायतिचे कामकाज पूर्णता ठप्प झाले आहे.आंदोलनाचा दुसरा टप्पा मानून जिल्ह्यातील प्रत्येक पंचायती समोर सोमवार दि २०/११/२०२३ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात करण्यात आले.मागील १२ वर्षा पासून ग्रामपंचायतमध्ये ग्राम विकास विभागाने नेमून दिलेले काम संगणक परिचालक प्रामाणिकपने करीत आहेत.

ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकार च्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक अविरतपने करीत असून दरम्यान या बाबत सर्व संगणक परिचालक एकत्र येऊन दारव्हा पंचायत समिती समोर एकदिवसीय धरणे आंदोलनाला दारव्हा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी आंदोलनाला भेट देऊन संगणक परीचालकांचे मागण्या संदर्भातील निवेदन स्वीकारून या बाबतचे एक पत्र शासनाला देऊन तुमचे मागण्या संदर्भात पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले.

१) गोरसेना संघटना जिल्हा अध्यक्ष किशोरभाऊ पालत्या.

२) ग्राम रोजगार सेवक संघटना दारव्हा व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष.

३) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष चरणभाऊ पवार सर.

४) ग्रामपंचायत कर्मचारी ४५११ संघटना शाखा दारव्हा.

५)ग्रामसेवक संघटना यवतमाळ जिल्हा व दारव्हा तालुका.

६) भीमराव राठोड प्रवक्तते समनक जनता पार्टी, यांची शुद्धा जाहीर पाठिंबा,या सर्व संघटनेने एकदिवसीय धरणे आंदोलनात जाहीर पाठिंबा दिला.

ग्रामपंचायतिचे ऑनलाईन आणि ऑफलाईन तसेच शासन कडून देण्यात येणारे इतर कामे सुद्धा केवळ ६९३० रुपये अतिशय तुटपूजे या महागाईच्या काळात त्यांना मिळते आणि तेही कधीच वेळेवर मिळत नाही.ग्रामपंचायती मध्ये बसून सर्व प्रकारची कामे कर असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळने आवश्यक आहे ग्राम विकास विभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने २०१८ मध्ये या सर्व संगणक परिचालक यांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात पद्निर्मिती करण्याची शिफारस केली आहे.
संघटनेच्या या प्रमुख मागण्यासाठी लढा सुरु आहेमहाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालक यांना यावलकर समिती च्या शिफारशी नुसार सुधारित आकृतिबंधात समावेश करून कर्मचारी दर्जा देणे व किमान वेतन २००००/-रु देणे तसेच टार्गेट सिस्टीम रद्द करणे .

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

five × one =