दिग्रसची आईशा फैजान शेख शालेय राष्ट्रीय ज्यूडो स्पर्धेत भारतात तिसरी कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव.

दिग्रस : दिग्रस येथील कु आईशा फैजान शेख हिने शालेय राष्ट्रीय ज्यूडो स्पर्धेत कांस्यपदक पटकावून देशातून तिसरे येण्याचा बहुमान पत्कविल्यामुळे तिच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . ती स्थानिक मोहनाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे.याबाबत सविस्तर असे की दिग्रस येथील दहा खेळाडूनी सांगली येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय ज्यूडो स्पर्धेत सहभाग नोंदविला होता . त्यापैकी कु. आईशा फैजान शेख , कु समृद्धी कपिले आणि कु.गार्गी थोरवे या विद्यार्थीनींनी आपापल्या वजनगटात सुवर्णपदक प्राप्त करत महाराष्ट्र ज्यूडो संघात आपले स्थान पक्के केले होते , तसेच राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता देखील मिळविली होती .

जम्मू आणि काश्मीर येथे १५ ते १९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान संपन्न झालेल्या शालेय राष्ट्रीय ज्यूडो स्पर्धेत येथील मोहनाबाई कन्या शाळेचीची विद्यार्थिनी कु. आईशा फैजान शेख आपल्या वजनगटात कांस्यपदकाची मानकरी ठरत देशातून तिसरी आली . प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक व ज्यूडोचे आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रा डॉ रविभूषण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक बापूरावजी बुटले कला , नारायणराव भट वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यलयात विनामुल्य चालविण्यात येणाऱ्या ज्यूडो प्रशिक्षण केंद्राची कु.आईशा फैजान शेख ही खेळाडू आहे .

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

दिग्रसच्या इतिहासात राष्ट्रीय शालेय ज्यूडो स्पर्धेत कास्यपदक पटकावत देशातून तिसरी येणारी कु आईशा फैजान शेख पहिली खेळाडू ठरली आहे . यापूर्वी सुधा तिने खेलो इंडिया राष्ट्रीय जुदो स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले होते , तसेच अनेक राज्य स्पर्धेत अनेक सुवर्णपदके प्राप्त केली आहे सोबतच उत्कृष्ट ज्यूडो खेळाडू म्हणून सन्मान मिळविला आहे .

कु आईशा फैजान शेख आपल्या यशाचे श्रेय आपले आई आणि वडील सोबत तिचे ज्यूडो प्रशिक्षक श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा.डॉ. रविभूषण माणिकराव कदम , फैजान शेख सर दिनबाई शाळा दिग्रस आणि डी. व्ही. एस. पी. मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार बंग आणि बापूरावजी बुटले कला नारायणराव भट वाणिज्य आणि बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यलयचे प्राचार्य डॉ.अरविंद लाडोळे यांना देते . देशातून तिसऱ्या स्थानी आल्याबद्दल तिच्यावर कौतुक व अभिनंदनांचा वर्षाव होत आहे .

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 + 15 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.