Yavatmal : यवतमाळ एसटी महामंडळात पदांची मेगा भरती ,13 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी.

Yavatmal : यवतमाळ एसटी महामंडळात पदांची मेगा भरती,बेरोजगारांना 13 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी. राज्यात विधानसभेची आचारसंहिता संपताच आता विविध विभागात शासकीय नोकऱ्यांची भरती सुरू असणार असल्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे यवतमाळ एसटी महामंडळात थांबलेल्या पदांच्या भरतीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.दोन दिवसापूर्वीच यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभागीय कार्यालयअंतर्गत शिकाऊ महिला पुरुष शिकाऊ उमेदवारांकरीता 208 रिक्त  जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून नियमानुसार अर्ज भरण्याची सुरुवात करण्यात आली आहे.

एसटी महामंडळात कंत्राटी पद भरती.

सरकारी नोकरीसाठी  सातत्याने प्रयत्न करताना युवकांना खूप परिश्रम घ्यावा लागतो.यात बेरोजगारांना काम मिळावा यासाठी सरकारी स्तरावर शासकीय विभागात राज्यात मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद भरती होते. महाराष्ट्रात यानुसारच मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन विभागांत चालक,वाहक आणि इतर विविध पदांसाठी पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येते.आता राज्यात विधानसभा निवडणुक संपल्यावर  आदर्श आचारसंहिता संपल्याने एस टी महामंडळाने कंत्राटी पद भरती प्रक्रिया सुरू केली असून,राज्य मार्ग परिवहन विभागिय कार्यालयांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात 208 शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

ही पदे भरण्यात येणार.

एस टी महामंडळ कार्यालय यवतमाळ कडून एकूण 208 पदांमध्ये 75 मोटर मेकॅनिक पद,30 शिटमेटल,34 डिझेल मेकॅनिक, 30 मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक, 20 वेल्डर,12 रेफ्रीजरेशन आणि एअर कंडिशनर रिपेअर, 2 टर्नर पद,5 पेंटर जनरल या पदांचा समावेश आहे. यासाठी महामंडळाने जी जाहिरात काढली आहे त्यात या पदांसाठी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये नियमित सामावून घेण्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही किंवा महामंडळावर घेतले जाईल,अस कुठलाही बंधन राहणार नाही, ही ही बाब महामंडळाने आपल्या जाहिरातीत स्पष्टपने नमूद केली आहे.

13 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारणार.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ  अंतर्गत कंत्राटी पद भरतीसाठी शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 208 रिक्त जागा भरण्यासाठी  पदांनुसार पात्र  उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागेल.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  13 डिसेंबर 2024 ठेवण्यात आली आहे.

ही राहणार शैक्षणिक पात्रता.

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ यवतमाळ विभागात पदांसाठी शिकाऊ महिला पुरुष उमेदवारांसाठी पदाचे नाव सहित शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण निश्चित करण्यात आले असून यानुसार एकूण पदसंख्या – 208 जागा,शैक्षणिक पात्रता –10th Pass,वयोमर्यादा – 18 – 33 वर्षे आणि नोकरी ठिकाण यवतमाळ राहणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज शुल्क ठेवण्यात आली असून सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क  रु. 590/- आणि SC/ST/PwBD उमेदवारांसाठी रु. 295/- राहणार आहे.

या साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in
वर संपर्क करावा. अशी माहिती महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळ यवतमाळ विभागीय कार्यालयाकडून जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

14 + 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.