Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशीम मतदारसंग मध्य महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना!
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)*
Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा २०२४ च्या निवडणुका जाहीर होवून सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित झाला नाही. मागील २५ वर्षापासून खासदार असलेल्या Bhavana Gawali यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारी बद्दल स्थानिक भाजपने विरोध सुद्धा दर्शविला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
आणि सध्याचे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री Sanjay Rathod यांनी लोकसभा उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या नावाची चर्चा आता बंद झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती सौ. Mohini Naik त्या सुद्धा खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे समजले आहे. त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री Eknath Shinde यांची भेट घेतली आहे.
परंतु मोहिनी नाईक यांनी शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल अशी अट टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता सौ. मोहिनी नाईक ह्या शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार का? आमदार इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात तर त्यांच्या सौभाग्यवती शिंदे गटात असे पहावयास मिळणार का?
भावना गवळी यांना उमेदवारी मिळाल्यास स्थानिक भाजपा भावना गवळीचा प्रचार करणार का ? भावना गवळी यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या अपक्ष निवडणूक लढवणार का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहे. विशेष बाब म्हणजे आमदार इंद्रनील नाईक यांचे बंधू श्री ययाती नाईक यांनी स्पष्टपणे शिवसेना ठाकरे गट यांचे लोकसभेचे उमेदवार Sanjay Deshmukh यांना पाठिंबा दिला आहे तर आता होणारी निवडणूक ही बघण्यायोग्य राहील हे मात्र निश्चित.