*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब *
बाभूळगाव येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी सांस्कृतिक भवन येथे दर वर्षा प्रमाणे दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने World Disability Day साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाभूळगाव येथील तहसीलदार मीरा पागोरे हे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार रामटेके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश मानलवार विजयराज शेगोकार, इसार संस्थेचे संचालक दिवाकर भोयर, सचिव नायगाव प्रांजली तालांन, नगरसेवक अनिकेत पोहोकार.
नगरसेवक शेख अहेमद उर्फ बब्लू भाई, नगरसेवक अमर शिरसाठ, सुनिता शेंडे, पत्रकार शहेजाद शेख, तालुका अध्यक्ष सलीम कुरेशी हे मंचकावर उपस्थित होते. कॅरीतास इंडियाच्या माध्यमातून समन्वय साधून, फलैक्समो आणि व्हॉइस या संस्थेमार्फत यावेळी 10 दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून दिव्यांगांना मार्गदर्शन केले.
तहसीलदार मीरा पागोरे यानी तहसील स्तरावरिल दिव्यांगा करीता असलेल्या योजनाची माहिती देऊन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले रामटेके यानी दिव्यांगाना मिळणार्या शासनाच्या योजने व दिव्यांगाचे हक अधिकार संबंधि माहिती दिली यावेळी उत्तम काम करणारे शासकीय अधिकारी नायब तहसीलदार रामटेके सुनिता शेंडे प्रांजली तालांन व नेहमीच दिव्यांगांना मदत करणारे समाज सेवक शब्बीर शहा डॉ,समीरा सिद्दिकी यांना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष ओम प्रकाश कांबळे ,शकीब सिद्दिकी, सोनिया भगत, धम्मा कांबळे ,माया येरने, गजानन परडखे,आनंद मेश्राम, महादेव प्रधान, राजेश चौधरी ,शाम बोबडे, रामेश्वर पवार, धर्मु लोहटे,त्र्यंबक वाघमारे आदी दिव्यांग बांधव मोठया संख्या उपस्थित होते.