दोषींना फाशीची शिक्षा द्या मणिपूर घटनेचा तीव्र निषेध,१ ऑगस्ट ला यवतमाळात धरणे आंदोलन,न्यायासाठी महिला रस्त्यावर.

यवतमाळ प्रतिनिधी

मणिपूर घटनेचा तीव्र निषेध, १ ऑगस्ट ला यवतमाळात धरणे आंदोलन.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

न्यायासाठी महिला रस्त्यावर.

दोषींना फाशीची शिक्षा द्या.

यवतमाळ शहरातील सर्व सामजिक संघटना तथा आदिवासी समाजबांधव मणिपूर येथील आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत दोषींना फाशीची शिक्षा देऊन आदिवासींना संरक्षण देण्यात यावे वाकरिता १ ऑगस्ट ला यवतमाळ शहरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हा तीव्र निषेध डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात येईल .

80 दिवसापूर्वी मणिपूर राज्यातील आदिवासी महिला बाबत झालेल्या व्हायरल व्हिडिओ मधील घटना ही अतिशय निंदनीय घटना असून एवढ्या दिवसाचा कालावधी होऊनही या घटनेचा कोणत्याहि प्रकारचा उलगडा झाला नव्हता मात्र तब्बल 75 दिवसानंतर हा घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे घटनेची तीव्रता संपूर्ण देशभरात पसरली असून आदिवासी समाजासोबत इतरही महिला वर्गात या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.

तर सदर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी व इतरही सहकाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी याकरिता सर्व समाज संघटना व समस्त आदिवासी संघटना त्यांचे पदाधिकारी व समाज बांधव या घटनेचा तीव्र निषेध नोंदवीत असून घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व सह आरोपीना सुद्धा कठोर अशी शिक्षा करण्यात यावी. मणिपुरमध्ये आदिवासी महिलांच्या अब्रूशी जे घडत आहे.

ते सारे जग उघड्या डोळ्यांनी बघत आहे. हा केवळ आदिवासी महिलांच्या अब्रूशी खेळला जाणारा खेळ नसून हा भारतीय महिलांच्या अब्रूशी खेळणाऱ्यांच्या आई, बहिणी, बायको आणि या भारत देशाच्या अब्रूशी त्याच्या सन्मान व इज्जतीशी खेळला जाणारा खेळ आहे. भारत माता की जय म्हणणाऱ्यानीच स्त्रीच्या पावित्र्याचे विटंबन करून देशाच्या अनुचे धिंडवडे काढण्याचे काम सुरु केले आहे.

अशा श्वापदांना ठेचून काढणे हीच काळाची मागणी आहे. फक्त निषेध नको रस्त्यावर या । आपल्या अपमानाचा बदला घ्या असे आवाहन यावेळी करण्यात आले.या धरणे आंदोलनाला सर्व स्तरातील बंधू भगिनीनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री अत्याचार विरोधी संघर्ष समितीने केले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eighteen + five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.