वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत शासन निर्णय पारित.
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) – कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने कारंजा नगर परीषद अंतर्गत शहरातील कामांना 10 कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी नगर परिषदेस विशेष अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. कारंजा परिषद अंतर्गत कामांना विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटनी साहेब यांनी न.प.प्रशासनामार्फत प्रस्तावीत केली होती.
दिनांक 26 जुलै 2023 रोजीच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने निर्णय पारित करत शासन निर्णय क्रमांक नपावै /२०२३/प्र. क्र.३२८(१०८)/नवी- १६/मंत्रालय मुंबई यांच्याकडून नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत कारंजा नगरपरिषद जिल्हा वाशिम करीता रक्कम रुपये दहा कोटी खालील कामांकरिता मंजुरात देण्यातआली आहे.सन २०२३- २४लेखाशिर्ष (४२१७- ०६०३) अंतर्गत नगर परिषद कारंजा जिल्हा वाशिम करिता दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे .
राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विशिष्ट अनुदानात कारंजा नगर परिषद अंतर्गत असणाऱ्या खालील कामांना मंजुरी मिळाली असून मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांना याकामी यश आले आहे.कारंजा येथील ब्रजलाल कॉलनी येथे सुशिल लोढा ते नरेंद्र चांडक यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 10लक्ष रूपये,कारंजा येथील ब्रजलाल कॉलनी येथे नरेंद्र चांडक ते ललीत चांडक यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 10लक्ष,कारंजा येथील ब्रजलाल कॉलनी येथे ललीत च चांडक ते अकोला रोडपर्यंत नाली बांधकाम करणे.अंदाजित किंमत 10लक्ष रूपये,कारंजा येथील चंदनवाडी येथे बरडीया यांचे घर ते सावरकर चौकाकडे नाली बांधकाम करणे.
अंदाजित किंमत 15लक्ष रूपये, कारंजा येथील टी.पॉइंट जवळील श्री गजानन फॅमिली रेस्टॉरंट ते वाकोडे ते ट्रेंडस शोरूम पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे अंदाजित किंमत 35लक्ष रुपये.
कारंजा येथील नुतन मंगल कार्यालय बस स्टैण्ड जवळील भाग ते सुनिल गुल्हाने नुतन कॉलनीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 133.37 लक्ष रूपये.
कारंजा येथील निलकमल ड्रेसेस ते अनिस मामदानी कॉम्प्लेक्स काण्णव जीन पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 35.63लक्ष रूपये.
कारंजा येथील दारव्हा रोडवरील हिंदू स्मशानभूमी येथील छत दुरुस्ती व सुशोभिकरण करणे अंदाजित किंमत 20 लक्ष रुपये.
कारंजा येथील शिवाजी नगर हिंदू स्मशानभूमी येथे सुशोभिकरण करणे आणि कारंजा येथील माळीपुरा येथे गणेश गोदे गल्ली रोडपासून आसरा माता मंदिर पर्यंत पेव्हर ब्लॉक नाली बांधकाम करणे व माळीपुरा रोडपासून किशोर पाठे यांच्या घरापर्यंत गल्लीत पेव्हर ब्लॉक बसविणे अंदाजित किंमत 25 लक्षरूपये.
कारंजा येथील माळीपुरा येथे एकविरा देवी मंदिर समोरील परीसरात वॉलकंपाउंड करणे 40 लक्ष रूपये ; कारंजा येथील माळीपुरा येथे एकविरा देवी संस्थान येथे सभागृह बांधकाम करणे,अंदाजित किंमत 25 लक्ष रुपये,कारंजा येथील प्रविण धारस्कर ते आशिष कुल्हेकर यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे व नाली बांधकाम करणे व समोरिल नालीवर धापा टाकणे.किंमत 10लक्ष रूपये.
कारंजा येथील बजरंग पेठे येथे भावराव भाजी भंडार ते पुणेवार यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम व काँक्रीटकरण करणे,कारंजा येथील बजरंगपेठ ते पिंपळे घर ते हनुमान मंदिरकडे नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 12 लक्ष रूपये.
कारंजा येथील कोष्टीपुरा येथे स्वामी मठ येथे सभागृह बांधकाम करणे.
कारंजा येथील कोष्टीपुरा येथे घुमाळे यांचे घरासमोरील परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे,कारंजा येथील कानडीपुरा येथे वैद्य यांचे घर ते वनवेश्वर मंदिराकडे दोन्ही बाजूने नाली बांधकाम करणे + युसुफ बेग यांच्या घरासमोरील नाली व धापा बनविणे अंदाजित किंमत 17.50 लक्ष रूपये ; कारंजा येथे दिल्ली गेट ते कृषी उत्पन्न बाजार समितीकडे रस्ता डांबरीकरण करणे अंदाजित किंमत 40 लक्ष रूपये ;
कारंजा येथील भंगार चौक किराणा दुकान पासून मुनाफ ट्रॅक्टरवाले यांचे घरापर्यंत दोन्ही गल्लीत पेव्हर ब्लॉक बसविणे, कारंजा येथील रंगारीपुरा येथे वैस ते टेकाम यांचे घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे अंदाजित किंमत 40 लक्ष रूपये ;
कारंजा येथील के. एन. कॉलेज जवळ विदर्भ नगर येथे अ.जलील अ.वहाब यांच्या घरापासून लल्लू गारवे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे अंदाजित किंमत 27 लक्ष रूपये ;
कारजा येथील गवळीपुरा येथे वकिल रेघीवाले घर ते हसन पटेल यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 10 लक्ष रुपये ;
कारंजा येथील शिवाय नमः मठ ते राठोड घर ते रेस्टहाऊस मागील बाजुपर्यंत व राठोड घर ते सेना महाराज सभा गृहापर्यंत रस्ता डांबरीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 72 लक्ष रुपये ;
कारंजा येथील डोणगावकर हॉस्पिटल ते जलील खाँ यांच्या घराकडे कॉक्रीट रस्ता दुरुस्ती करणे अंदाजित किंमत 20 लक्ष रुपये ;
कारंजा येथील बेंबळपाट परिसरातील अशोक जिचकार ते कोळस्कर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 24 लक्ष रुपये ;
कारंजा येथील हटोटीपुरा येथील मुरलीधर मंदिर येथे सुशोभिकरण करणे अंदाजित किंमत 15 लक्ष रुपये ;
कारंजा येथील जाणता राजा चौक ते आंबेडकर चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे अंदाजित किंमत 70 लक्ष रुपये.कारंजा येथील रत्नदिप यांच्या घरापासून ते राजु खारमुरे ते बाबा ग्राउंड व लाडली ड्रेसेस ते नॅशनल ते सुरजुसे घर ते परिवार कलेक्शन ते फारूख घड़ीवाले पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे अंदाजित किंमत 40 लक्ष रुपये. कारंजा येथील बजरंग पेठ येथे सचिन कोळसकर यांच्या दुकानापासून ते भोपाळे ते सराफ लाईन गंधक किराणा पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे अंदाजित किंमत 15 लक्ष रुपये ;
कारंजा येथील शिवाजी महाराज पुतळा ते पोहावेशपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 160 लक्ष रुपये ;
कारंजा येथील बंजारा कॉलनी येथे आडे पटवारी ते नाईक सभागृह, पांडे ते महादेव राठोड व गोपाल राठौड ते बोळकर व प्रविण पवार ते नांदेकर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे अंदाजित किंमत 30 लक्ष रुपये ;
कारंजा येथील शिवाजी नगर परिसरातील विविध नाल्या बांधकाम करणे अंदाजित किंमत 10 लक्ष रुपये ; कारंजा येथील सिंधी कॅम्प येथे गुरुवाणी ते अशोक जमनानी यांचेघरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे अंदाजित किंमत 14 लक्ष रुपये ;
कारंजा येथील सिंधी कॅम्प येथे शांतीलाल केसवाणी गोडाऊन ते गोपाल चोपडा यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे अंदाजित किंमत 14 लक्ष रुपये ;
इत्यादी कामांना मंजुरी मिळली असुन कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी शहरातील विकास कामांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमूख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले आहे.