Pusad Accident: पुसद वाशिम मार्गावर भीषण अपघात.

Pusad Accident: पुसद वाशिम मार्गावर भीषण अपघात.

*पुसद तालुका प्रतिनिधि: शेख फिरोज गनी ( ईसापुर धरण)*

Pusad Accident|पुसद :- दिनांक ०७ डिसेबर २०२३ रोजी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पुसद वाशिम मार्गावर मोमीनपुरा जवळ एक दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगाने चालवून उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार एक ३५ वर्षीय युवक हा त्याची मोटरसायकल क्रमांक एम एच ०५ बी पी १९२४ या दुचाकीने भरधाव वेगाने जात असताना अचानक वाशिम रोडवर उभा असलेला ट्रक क्रमांक एम एच ३८ डी १०१० या ट्रकला दुचाकीस्वाराणे मागून जबर धडक दिली.

या धडकेनंतर सदर दुचाकी स्वाराला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर युवक हा जणूना येथील असल्याचे तेथील नागरिकांकडून समजले आहे. घटनेचा अधिक तपास वसंत नगर पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 5 =