पूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.

पूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.

यवतमाळ : पूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.इतिहासातील विक्रमी पाऊस जिल्ह्यात कोसळल्यानंतर सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली.यातूनच ज्यांचे सर्वस्व वाहून गेले अशा लोहारा आणि भारी (तळेगाव) येथील पूरग्रस्तांसाठी माऊली अर्बन बँक धावून आली.त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करून त्यांचे सांत्वन केले. या कार्यातून ‘माऊली’ने पुन्हा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे.

यंदा कोसळलेल्या पावसाने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. या अतिवृष्टीचा फटका सर्वच घटकाला बसला.यातील कष्टकरी,शेतकरी सोडले तर बाकीचे आपले आयुष्य पूर्ववत करू शकतात. त्यामुळे या घटकासाठी माऊली अर्बन बँकेने अन्नधान्य, कपडे,भोजनाची व्यवस्था करण्याचा उद्देश ठेवला.यासाठी काँग्रेसचे युवा नेते, सामाजिक भान जपणारे बँकेचे अध्यक्ष जितेश नावडे यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात उपक्रम हाती घेतला.

नावडे यांच्या आवाहनानंतर अनेकांनी बँकेकडे कपडे व इतर साधनांची पूर्तता केली.लोकांकडून गोळा झालेली व त्यात माऊली बँकेची वैयक्तिक मदत मिळून लोहारा आणि भारी येथील पूरग्रस्तांना ही मदत देण्यात आली.यासाठी बँकेचे अध्यक्ष जितेश नावडे,श्रीराम सरमुकदम , अजय मनवर , सुशांत मलोदे ,निखिल ठाकरे , आचल जाधव , दीपाली रंगारी ,सौरभ राजपूत , गोपाल देवकते , श्रेया तेलंगे , बबिता मेहरे , अमोल सावरकर आदींनी परिश्रम घेतले.यापुढेही आवश्यक त्या ठिकाणी अश्याच प्रकारची मदत पुरविल्या जाईल,अशी माहिती बँकेचे अध्यक्ष नावडे यांनी दिली आहे.बँकेने दाखविलेल्या या सामाजिक जाणिवेचे समाजातून कौतुक होत आहे.
सहकार क्षेत्रातील पहिली संवेदनशील बँक म्हणून माऊली अर्बन बँकेची ख्याती सर्वदूर पसरली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − twelve =