प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून किनखेडा येथील ५३ शेतकरी वंचित वर्षभरापासून एकही किस्त मिळाली नाही : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.

फुलचंद भगत

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मंगरुळपीर – वाशिम तालुक्यातील ग्राम किनखेडा येथील ५३ शेतकर्‍यांना अद्यापही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही. गेल्या वर्षभरापासून त्यांना एकही किस्त मिळाली नसून त्यासाठी हे शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. यासंदर्भात शेतकर्‍यांनी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, सदरहू ५३ शेतकर्‍यांकडे शेती उपलब्ध असून सुध्दा हे शेतकरी सन्मान निधीतील २ हजाराच्या लाभापासून वंचित आहेत. सदरहू शेतकरी गरीब कुटूंबातील असून यापैकी कुणीही आयकर भरणार नाही. सदर शेतकर्‍यांना गेल्या वर्षभरापासून योजनेची एकही किस्त मिळाली नाही. यासंदर्भात शासकीय कार्यालय व बॅकांमध्ये विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना योग्य माहिती दिल्या जात नाही. सदर योजनेच्या संकेतस्थळावर सर्च केले असता त्यात लॅन्ड सिडींग नो असे स्टेटस दाखविल्या जात आहे. सदरहू त्रुटी कशामुळे आली याबद्दल शेतकर्‍यांना काहीही माहित नसून टोल फ्री क्रमांकावरही त्यांचे योग्य ते समाधान केल्या जात नाहीत.

सदर शेतकर्‍यांवर होणारा अन्याय दुर करुन त्यांना त्वरीत किसान सन्मान निधीचा लाभ मिळवून देण्यााची मागणी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. निवेदन देतांना मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, तालुका संघटक रघुनाथ खूपसे शेतकरी विठ्ठल जाधव, माणिक इंगोले, राजु खांबलकर, हनुमान सावके, रामभाऊ खांबलकर, नर्मदा लांडकर, शोभा जाधव, भास्कर कढणे, ज्योती इंगोले, विकी इंगोले, नामदेव खुपसे, दत्ता लांडकर, मोतीराम भगत, पद्माकर कांबळे, बाळु भगत, राम कांबळे, शंकर भगत, गजानन लांडकर, विनायक लांडकर, प्रल्हाद सुर्वे, शंकर खुपसे, प्रदीप गायकवाड, पवन लांडकर, कैलास लांडकर, संजय सुर्वे, सुगत गायकवाड, दत्ता लांडकर, रुख्मीना सुर्वे, भिमराव भगत, केशव भगत, सुभाष कड, विठ्ठल खुपसे, विजय लांडकर, नामदेव गायकवाड, वसुदेव लांडकर, उत्तम भगत, सिध्दार्थ भगत, साहेबराव भगत, शारदा भगत, गौतम गायकवाड, दामोदर भगत, राघोजी चोंडकर, महादेव खांबलकर, प्रकाश गायकवाड हे ५३ शेतकरी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

5 × 3 =