Murder Case: वाघापूर येथे जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून.

Murder Case: वाघापूर येथे जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून.

आठवड्यात तिसरी घटना : आरोपीचे अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण.

Murder Case: शहरातील वाघापूर टेकडी येथे सकाळी १० वाजता जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपीने स्वत:च अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली. जिल्ह्यात आठवडभरात खुनाच्या तीन घटना घडल्या आहे. उमरखेड, कळंब आणि शनिवारी यवतमाळ शहरात खून झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

ऐन दिवाळीच्या सणातच गंभीर गुन्हे सातत्याने घडत आहेत. पोलिसांकडून नियंत्रणासाठी केले जात असलेले प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसून येते. नंदू ऊर्फ अक्षय भीमराव मनवर (३२, रा. वाघापूर टेकडी) असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर आरोपी गज्या ऊर्फ अक्षय विजय चौधरी (२४) याने चाकूने वार केले. गंभीर अवस्थेत नंदूला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे नंदूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोपी राज्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या शिरावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. घरफोड्या, चोरी, मारहाण असे गुन्हे असलेला गज्या बेघर आहे. तो वाघापूर टेकडी परिसरातील मंदिरामध्ये राहत होता. त्याचा नंदू ऊर्फ अक्षय याच्यासोबत जागेच्या पैशावर वरून वाद होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी गज्याने नंदूला बोलावून त्याच्यावर चाकूने वार केले.

या घटनेनंतर आरोपीने तेथून थेट अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठले. त्याने रक्ताने माखलेला चाकू दाखवत खून केल्याची कबुली दिली. गज्याने स्वतःच पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. घटना लोहारा पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने त्याला लोहारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया लोहारा पोलिस ठाण्यात सुरू होती.

याप्रकरणी कमलेश भीमराव मनवर याने दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दीपककुमार कांबळे करीत आहेत.

जिल्ह्यात आतपर्यंत ७१ खुनाचे गुन्हे दाखल.

यवतमाळ शहर व जिल्ह्याची ओळख क्राईम कॅपिटल म्हणून ओळख बनली आहे. येथे सातत्याने खुनासारखे गंभीर गुन्हे होत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यांत ७१ खुनाच्या घटना घडल्या आहेत. वैयक्तिक वाद, मालमत्तेचा वाद, गुन्हेगारांतील संघर्ष यातून गंभीर घटना घडत असल्याचे दिसून येते. हे सत्र कसे थांबविता येईल, यावर विचार होणे गरजेचे झाले आहे.

वाघापूर येथे शनिवारी सकाळी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी गज्या चौधरी याला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले होते. तेथून सुटताच त्याने एकाचा खून केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 2 =