*मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी धडकले तहसील कार्यालयावर*

*मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी धडकले तहसील कार्यालयावर*

आर्णी तालुका प्रतिनिधी : गणेश एकंडवार

आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व तसेच आर्णी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी मणिपूर येथील हिंसक घटनेतील आदिवासी महिलांवर झालेल्या अन्याय, अत्याचार घडवून आणलेल्या दोषींना फाशीची शिक्षा देऊन आदिवासींना संरक्षण देण्यात यावे.
अशा घोषणात आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी तीव्र निषेध केला.

*मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी धडकले तहसील कार्यालयावर*

80 दिवसापूर्वी मणिपूर राज्यातील आदिवासी महिला बाबत झालेल्या व्हायरल व्हिडिओ मधील घटना ही अतिशय निंदनीय घटना असून एवढ्या दिवसाचा कालावधी होऊनही या घटनेचा कोणत्याहि प्रकारचा उलगडा झाला नव्हता, मात्र तब्बल 75 दिवसानंतर हा घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे घटनेची तीव्रता संपूर्ण देशभरात पसरली असून आदिवासी समाजासोबत इतरही महिला वर्गात या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.

*दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे*

तर सदर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी व इतरही सहकाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी याकरिता सर्वपक्षीय पदाधिकारी व समस्त आदिवासी संघटना त्यांचे पदाधिकारी व समाज बांधवांनी भारतीय संविधान व महापुरुषांचा जयघोषात घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना जितेंद्र मोघे, राजेंद्र जाधव, विष्णू उकंडे, राजू तोडसाम, राजूभाऊ चांदेकर, तुळशीरामदास मोरकर, विनोद सोयाम, सुनील सुखदेव, तुकाराम सोयाम,प्रशिक मुनेश्वर, वाघमरे ,पोटे मॅडम, राहुल सोयाम,अजय भयमारे,योगेश तडसे इतरही आदिवासी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 5 =