मणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी)
प्रतिनिधी लक्ष्मण वानखडे
वासिम जिल्ह्यातील मानोरा तहसील कार्यालयावर दिनांक २६ जुलै २०२३ रोजी मानोरा येथे दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चाचे आयोजक समाज क्रांती आघाडी सामाजिक समता प्रबोधन मंच बहुजन युवा संघर्ष वाहिनी यांनी केला होता. सेवालाल महाराज ध्वजास पूजन व पुष्प माला अर्पित समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे यांनी केले. मोर्चास प्रारंभ झाला. मणिपूरचे शासन बरखास्त व्हावे. महिलावर अन्याय अत्याचार बलात्कार करून त्यांचा खून करणारे मारेकार्यावर गुन्हे दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी.
ज्या प्रशासनाने आपल्या कर्तव्यामध्ये अधिकाराचा दुरुपयोग केला त्यांना नोकरीमधून कायमस्वरूपी काढून टाकावे. नदी ,नाल्या च्या पुरामुळे शेतकऱ्यांचे शेती खरडून गेले त्यांना तात्काळ मदत मिळावी तसेच कारंजा मानोरा आणि वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टी ग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये प्रति एकरी आर्थिक मदत करावी इत्यादी मागण्यासाठी. मनोरेकरांनी आक्रोश करीत प्रशासनाची लक्ष मोर्चाकडे वेधून घेतले या मोर्चाचे आयोजन समाज क्रांती आघाडी. सामाजिक समता प्रबोधन मंच. बहुजन बहुजन युवा संघर्ष वाहिनी यांनी आयोजन केले होते कार्यक्रमाची सर्व प्रस्ताविक प्राध्यापक जय चव्हाण यांनी केले. त्यामध्ये तीव्र निषेध मोर्चाची सविस्तर भूमिका त्यांनी आपल्या प्रस्तावने ठेवली. समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष हंसराज शेंडे म्हणाले की या देशांमध्ये झुंडशाही.
गुंडशाही सुरू झाली असून लोकशाही नावापुरती राहिलेली आहे. ज्यांनी या देशात हुकूमशाही चालवली आहे. या देशात हुकुमशाही आणण्यासाठी जनता जबाबदार आहे. जर तुम्ही सत्ताधाऱ्यांना खुर्चीवर बसू शकता. तर खुर्चीवर खाली खेचू शकता. ही जबाबदारी आता जनतेची आहे. असा खणखणीत इशारा त्यांनी दिला. दिल किस बानो प्रकरण, अकलक अहमद प्रकरण, याचवेळी या देशातील जनता जागरूक झाली असती. तर मध्य प्रदेश मध्ये भाजपचा कार्यकर्ता आदिवासीच्या मुलावर उभ्याने लघवी करतो. हे घडलं नसतं. आमच्यातली मानवता आमच्यातली माणूस पण तेव्हा जागी झाले असते आज मनिपुर मध्ये हा नंगानाच चाललेला आहे त्या राज्यातील अनेक लोकांना आपले घरदार सोडून जावं लागत आहे महिलांची नग्न धींड काढून त्यांच्यावर पाशवी बलात्कार करून, त्यांचा खून केला जातो.
घटना घडली नसती. या पृथ्वीवर दोनच जाती आहेत एक स्त्री दुसरा पुरुष म्हणून हा मोर्चा आदिवासींचा नसून हा मोर्चा मानवतेचा आहे. समतेचा आहे समानतेसाठी आहे कारण या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माची लोक सहभागी झाले आहेत त्यांनीही दाखवून दिले ही लढाई मानवतेची आहे आम्हीही सहन करणार नाही. बळीरामजी राठोड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले गजानन राठोड, विनायक पद्मगिरीवार ,डॉक्टर पाटील, राजेश मस्के , मकराम पवार अनेक मान्यवरांनी आपली मत व्यक्त केले व निषेध नोंदविला घडलेल्या घटनेची निंदा केली. या मोर्चामध्ये समाज क्रांती आघाडी, सामाजिक समता प्रबोधन मंच, बहुजन युवा संघर्ष वाहिनी, बिरसा क्रांती दल, विविध संघटनेंनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाची संचलन गोपाल जी शर्मा यांनी केले आभार विष्णूजी वाडेकर यांनी मानले.