Maharashtra Politics : धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातील “पुरुष वेश्या”!!!

Maharashtra Politics : बीड जिल्ह्यात मस्साजोग गावाच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर राज्यात राजकारण तापलेला असताना ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात वारंवार भाष्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाचे खास शिलेदार म्हणून ओळख असलेले आमदार जानकर यांनी EVM घोटाळ्या संदर्भात भाष्य करतानाच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.धनंजय मुंडे हे राजकारणातील “पुरुष वेश्या”आहेत असे खळबळ जनक विधान केलेले आहे.

गृहमंत्री शुद्धीवर असते तर राज्यात वाल्या कोळी तयार झाला नसता.

मस्साजोग प्रकरण घडल्यानंतर सरकारने मुंडे यांच्यावर आरोप होताच पहिल्या दिवशी राजीनामा घ्यायला हवे होते,राज्याचे गृह खाते जागे असते,आणि शुद्धीवर असते तर राज्यात असा “वाल्या कोळी”तयारच झाला नसता.सध्या सरकारचे गृहमंत्री यांच्या आणि सरकारी आशीर्वादानेच राज्यात पूर्णपणे गुंडगिरी सुरू आहे. सरपंच देशमुख खून प्रकरणात वाल्मीक कराड फरार झाला होता.नंतर वाल्मीक कराड आणि सरकारमध्ये तडजोड झाली अन् त्याने पोलिसांना सरेंडर केले, यामुळेच कराडला घरापेक्षा चांगली सोय ही बीड पोलीस ठाण्यात मिळत आहे.असा थेट आरोप आमदार जानकर यांनी केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

ईव्हीएम घोटाळा मुद्द्यावर पुन्हा हल्लाबोल.

निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन हॅक होत नसल्याचा दावा करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकार यांनी पुन्हा सरकार आणि  निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलेला आहे.

राज्यातील सत्ताधारी पक्षावर ईव्हीएम घोटाळा संदर्भात आरोप करताना माळशिरस मतदार संघाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटले आहे की,निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचा दावा निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि सत्ताधारी राजकीय नेते करीत आहेत, मात्र तेच मशीन आमच्याकडे द्या आम्ही 10 मिनिटात Evmमशीन हॅक करून दाखवू,कारण हे काय तंत्रज्ञान आहेत आम्हाला माहित आहे.

तुम्ही ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळे कसे केलेत,जनतेची मते कशी चोरली हे मी आता पुराव्यानिशी सांगत आहो.राज्यात स्वायत्त संस्था ज्या पद्धतीने सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहे ते देशासाठी तर घातक आहेच पण सरकार ज्या पद्धतीने या संस्थांचा आपल्यासाठी वापर करताना दिसत आहे ते देखील महाभयंकर घातक आहे.

निवडणूक आयोग भाजपसाठी नोकरा सारखे काम करत असल्याचा गंभीर आरोप आ.जानकर यांनी केला आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि Evm घोटाळ्या संदर्भात भाष्य करताना आ.जानकर यांच्या या विधानाने महाराष्ट्रातील राजकारणात बुधवारी एकच खळबळ माजताना दिसली.

पण जानेवारीला पराभूत उमेदवारांची आणि ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात एकत्रित बैठक घेणार.

महाराष्ट्रात ज्यांनी राजकीय पक्षांमध्ये वर्चस्वाचे राजकारण सुरू केलेले आहेत, त्यांचे हातात आज सत्ता आहे हे खरे आहे,मात्र भविष्यात कुठेतरी पुन्हा कृष्ण हा जन्माला येतोच, ज्यांनीही राज्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांपेक्षा अजित पवार मोठे नेते,उद्धव ठाकरे पेक्षा एकनाथ शिंदे मोठे असे चित्र तयार केले आहे ते समोर वाचणार नाहीत,असा अप्रत्यक्ष इशारा निवडणूक आयोगाला आमदार जानकर यांनी दिला असून, केंद्रातील आणि महाराष्ट्रातील दोन्ही सरकार लवकरच करणार असा दावा पुन्हा उत्तमराव जानकर यांनी केले.तसेच 15 जानेवारीला सर्वपक्षीय 288 पराभूत झालेल्या उमेदवारांची आणि ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात मुंबई येथे आपण एकत्रित बैठक घेणार असल्याचे आ.जानकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना जाहीर केले.

राज्यात एकीकडे खून प्रकरणात अटक झालेल्या वाल्मीक कराडची संपत्ती सार्वजनिक होत असताना कॅबिनेट मंत्री मुंडे यांच्यासोबत कराडचे अत्यंत निकटवर्ती संबंध, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधक आणि सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार सुरेश अण्णा धस यांच्या निशाणावर आले असताना मुंडे हे आधीच अडचणीत आहे.त्यांच्यावर राजीनामा देण्याचे दबाव आहे.आता आमदार जानकर यांनी त्यांच्याविरुद्ध केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची आणखी कोंडी होताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.