दारव्हा तालुक्यातील रामगाव (रामेश्वर ) येथे पूराचे पाण्याने झालेल्या अनेक बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात.

बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

दारव्हा तालुक्यातील रामगाव (रामेश्वर ) येथे पूराचे पाण्याने झालेल्या अनेक बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात .

 

दारव्हा –

दारव्हा तालुक्यातील कारंजा रस्यावरील रामगांव ( रामेश्वर ) येथे नदीच्या पूराच्या पाण्याने हाहाःकार केला होता . त्यामध्ये अनेक घरे वाहून गेले . अनेक घरांची पडझड झाली.आणि त्यांचा राहण्याचा, जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यामध्ये यवतमाळ येथील अस्तित्व फाऊंडेशन तर्फे या पूरग्रस्ताना मदतीचा हात दिला आहे .पूराच्या या पाण्यामुळे नदीकाठील दोन्ही बाजूला असणारी कच्ची घरे अक्षरशः वाहून गेली . तर अनेक पक्क्या घरामध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

ही परिस्थीती पाहून यवतमाळ येथील अस्तित्व फाऊंडेशन तर्फे अध्यक्षा अलका कोथळे, सारीका ताजने, पुष्पा तिडके व सहकारी यांनी पवार यांचे मदतीने प्रत्यक्ष त्या गावात जाऊन बाधीत कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात दिला आहे . २५ जुलैला सकाळी निघून रामगाव (रामेश्वर ) येथे पोहोचून पूरग्रस्त कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले . त्यामध्ये चादर, ब्लँकेट, साड्या, पेटीकोट, पुरुषांचे कपडे, इनर गारमेंटस् , महिलांसाठी सेनेटरी पॅड, शाल आणि जेवणाच्या सामानामध्ये कणीक, तांदूळ, तेल इत्यादी साहीत्य पुरविण्यात आले आहे . या कार्यात यशवंत पवार , पवार बंधू, बंडू कान्हे, गावच्या सरपंच इंगळे ताई तसेच गावकरी मंडळीनी त्यांना सहकार्य केले .

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

5 + 7 =