पूरग्रस्तांना “अस्तित्व फाउंडेशन” द्वारे एक हात मायेचा.
यवतमाळ
संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यात अनेक कुटुंबाचे घरदार मालमत्ता व शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक कुटुंब उघड्यावर आलेले आहे.सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या अस्तित्व फाउंडेशन यवतमाळ द्वारे भारी या गावात भेट देण्यात आली तेथील 19 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची किट चे वाटप करण्यात आले यात डाळ तांदूळ कणिक तेल तिखट हळद मीठ बेसन चहा साखर बिस्किट राजगिरा लाडू व केळी यांचे वाटप करण्यात आले.
येथील जवळपास 40 ते 42 स्त्री-पुरुषांना कपड्यांचे वाटप करण्यात आले यात साडी ब्लाउज अंडरगारमेंट सॅनिटरी नॅपकिन्स शर्ट पॅन्ट लहान मुलांचे कपडे ड्रेस टॉवेल चादर स्वेटर व काही सतरंज्या यांचे वाटप करण्यात आले. शाळकरी मुलांना दप्तर वह्या पुस्तके पेन पेन्सिल खोड रबर बिस्किटांचे पुडे व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर अस्तित्व फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर कविता बोरकर यांनी भारी येथील रुग्णांची तपासणी करून 50 रुपयांना गोळ्या औषधी देण्यात आल्या.
त्यानंतर अस्तित्व फाउंडेशनच्या मेंबर्सने उखंडापोड येथे भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला व 5 लहान मुलांना दप्तर वह्या पेन पेन्सिल देण्यात आल्या. व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर मोहाफाटा या गावाला भेट देण्यात आली तेथील एका घराची संपूर्ण भिंत कोसळून गेल्यामुळे कुटुंबाला उघड्यावर राहण्याची वेळ आली त्या कुटुंबातील सदस्यांना कपडे धान्याची किट मुलांना दप्तर वह्या पुस्तके पेन पेन्सिल यांचे देखील वाटप करण्यात आले.” अस्तित्व फाउंडेशन द्वारे शासनाला विनंती आहे की ज्या पूरग्रस्तांचे घराचे नुकसान झालेले आहे त्यांना राहण्याकरता योग्य जागा किंवा तात्पुरती घरे, ज्यांची सरकारी कागदपत्रे राशन कार्ड बँकेचे पासबुक शाळेचे डॉक्युमेंट हरवलेले आहे ते लवकरात लवकर बनवून देण्यात यावे.
पूर परिस्थितीमुळे महामारीचा धोका निर्माण झालेला आहे तसेच अन्नधान्य चढल्यामुळे रोगराई होऊ नये डास होऊ नये याकरता जंतुनाशक फवारणी करण्यात यावी अशी शासनाला विनंती आहे.अस्तित्व फाउंडेशन तर्फे अलका कोथळे डॉक्टर कविता बोरकर करुणा धनेवार श्रुती कोथळे डिंपल नक्षणे कृष्णा टेवाणी भारती जानी शुभांगी कानसकर व पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले.