Accident Case: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू.

Accident Case: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र मोहम्मद अदीब*

Accident Case: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार  तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14जानेवारी रोजी रात्री  9.30वाजताच्या दरम्यान नांदुरा गावाजवळील बेंबळा नदीच्या पुलावर घडली. रोशन सुरेश डोंगरे वय 27 वर्ष रा बागवडी ता. बाभुळगाव असे मृतकाचे नाव आहे.

मृतक रोशन हा मावशीकडून डेहणी या गावरुन बागवाडी आपल्या गावी होंडा ड्रीम MH29 BTO535 या दुचाकी गाडीने जात असतांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.तर दुचाकीचा चुराडा झाला. सदर घटनेची लेखी तक्रार मृतकाचे वडील सुरेश सुखदेव डोंगरे यांनी बाभूळगाव पोलीस स्टेशनला दिली असून जमादार निसार अहेमद खान व बाभूळगाव पोलीस त्या वाहनाचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × three =