शहरातील अनेक प्रश्नांना घेऊन आरंभ फाऊंडेशन आक्रमक, अनेक मागण्यांचे न. प. ला निवेदन.
यवतमाळ / प्रतिनिधी
शहरातील अनेक प्रश्नांना घेऊन आरंभ फाऊंडेशन आक्रमक, अनेक मागण्यांचे न. प. ला निवेदन.
शहरासह जिल्हाभरात अतिवृष्टी होत असल्याने अनेक समस्या मुळे नागरिक हैराण झाले आहे. पावसाळाच्या पूर्वी नगर परिषद कडून गटारांची स्वच्छता न झाल्याने शहरातील अनेक गटारे तुंबली परिणामी यातील पाणी आजूबाजूच्या घरात व दुकानात गेले. शहरातील तलाव फैल, गोदाम फैल, लोहारा, वाघापूर आर्णी रोड, बांगर नगर या भागात याचा मोठा फटका बसून लोकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तर आज दुपारी गटाराचे झाकण उघडे असल्याने एक स्त्री पाण्यात वाहून गेल्याची घटना बांगर नगरात घडली.
या सर्व समस्येचा अंदाज घेऊन पावसाळ्या पूर्वी या गटारांची स्वच्छता केली गेलीं असती तर ही परिस्थीती उद्भवली नसती असे मत स्थानिक जनतेकडून व्यक्त केले जात आहे. याचं पार्श्वभुमीवर आज शहरातील आरंभ फाऊंडेशनच्या वतीने या मुद्द्याला घेऊन नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
शहरातील सर्व गटारांची स्वच्छता करून हे गटारे मोकळी करावी.
याच बरोबर शहरात ठिकठिकाणी गवत व झुडपे वाढलेली आहेत. यातून विषारी प्राण्यांचा धोका वाढत चाललेला आहे. नगर परिषद प्रशासनाने हे गवत कापून परिसर स्वच्छ करावा. तर पावसाच्या पाण्याने मच्छर, डासांची संख्या वाढून ताप, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या रोगांचे प्रमाण वाढेल याची खबरदारी म्हणून शहरात तात्काळ धूर फवारणी करावी अशी मागणीही दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर सर्व कामे करत असताना मनुष्यळाची गरज भासल्यास आरंभ फाऊंडेशन श्रम दान करेल अशी भुमिका फाऊंडेशन कडून व्यक्त करन्यात आली. या आशयाचे निवेदन आज आरंभ फाऊंडेशनच्या वतीने नगर परिषद प्रशासना कडे देण्यात आले आहे. यावेळी आरंभ फाऊंडेशनचे अध्यक्ष मनिष शिरभाते, सोनू गुप्ता, साहिल पेठे, वसिम मवाल, विशाल बिसेन, प्रशांत ढोरे, जय ठेबुर, दर्शन राऊत यांच्यासह असंख्य सदस्य उपस्थितीत होतें.