एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत !

एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत !

2024 मध्ये मतदारच ठरवतील राजकारणाची दशा आणि दिशा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येक राज्य व केंद्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत या घडामोडींचा जर विचार केला तर पूर्वीपासून चालत आलेली राजकीय परंपरा ही आता कोणती नागमोडी वळणे पार करून कोणत्या दिशेला जात आहे आणि या राजकारणाची दशा ही कोणत्या काठीण्य पातळीपर्यंत खालावत चाललेली आहे हे सर्वसामान्य मतदाराच्या लक्षात न येण्या एवढे कठीण राहिले नाही.एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत ! असे गृहीत धरून कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदार हा मतदानाला सामोरे जाताना योग्य उमेदवाराचा,चांगल्या पक्षाचा (राजकीय पार्टीचा) आणि इतर आपापल्या मतानुसार सर्व गोष्टींचा विचार करूनच मतदान केंद्रावर जाऊन मतदान करीत असतो.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बहुतांशी निवडून आलेले उमेदवार मात्र मतदान करणाऱ्या मतदाताचा तसेच भविष्यकालीन निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार न करता काही ठराविक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ते स्वतःच्या सोयीनुसार आपापली जागा ठरवून घेताना दिसत आहेत.जाणता आणि जागृत मतदारराजा मात्र या सगळ्या घडामोडींचा सूक्ष्मतेने निरीक्षण करताना दिसून येत आहे.तसेच या सर्व राजकीय घडामोडींची चर्चा आपापल्या विचारसरणीला पटणाऱ्या मतदार राजाशी करताना दिसून येत आहेत.एवढेच नव्हे तर 2024 च्या निवडणुकीत कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो किंवा कोणत्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो शिवाय कोणकोणत्या नवीन उमेदवाराला संधी मिळू शकते आणि कोणकोणते नवीन उमेदवार शंभर टक्के निवडून येऊ शकतात हे सुद्धा भाकीत व्यक्त करताना दिसून येत आहे आणि असे राजकीय विभिन्न समीकरण सर्वत्र ऐकण्यातही येत आहे.

काहींच्या मते राजकीय निवडणुकीचे गणित हे साम-दाम-दंड-भेद असे जरी असले तरी आज राजकीय निवडणूक ही मतदान करणाऱ्या मतदाराच्या अंतर्मनातील एका केंद्रस्थानी स्थिरावलेली आहे. सत्तेचे राजकारण,पैशाचे राजकारण,घराणेशाहीचे राजकारण अथवा इतर कोणत्याही दबाव तंत्राच्या राजकारणाचा किंचितही विचार न करता जाणते आणि जागृत मतदार हे इसवी सन 2024 च्या प्रत्येक होणाऱ्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा कौल हा योग्य उमेदवाराला देऊन राजकारणाची दशा आणि दिशा ठरवतील यात काही शंका वाटत नाही. मतदार राजांकडून राजकीय ऐतिहासिक घडामोडींचे हेच पैलू वर्तमान काळातील खालावलेली राजकारणाची दशा सुधारतील आणि भविष्यकाळातील राजकारणाला योग्य दिशा देतील.असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही.धन्यवाद !

एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत !

सी.के.पवार
एम.ए.बी.एड.पी.जी.डी.सी.जे.
बंजारा चित्रपट निर्माता-दिग्दर्शक व समाजसेवक
राजकीय विश्लेषण : सोमवार दिनांक 31 जुलै 2023.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twelve − 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.