Yavatmal : स्वातंत्र्य दिनानिमित्त पारवा येथे मदरसा दारुलउलूम अनवारुल इस्लाम येथे भव्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन.
Yavatmal स्वातंत्र्य दिनानिमित्त पारवा येथे मदरसा दारुलउलूम अनवारुल इस्लाम येथे भव्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन.
यवतमाळ/देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक दायित्व व देशसेवा म्हणून गुरुवार १५ ऑगस्ट 2024 रोजी यवतमाळ नजिक असलेल्या दारुलउलूम अनवारुल इस्लाम मदरसा पारवा येथे भव्य प्रमाणात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनी आयोजित या शिबिरात सकाळी ९:०० ते ११:०० पर्यंत डायमंड उर्दू शाळा व दारुलउलूम अनवारुल इस्लाम, पारवा, यवतमाळ येथे चिकित्सक डॉ. अरुण जनबंधु, डॉ. माधुरी ए. जनबंधु, डॉ. शब्बीर शेख,(अस्थीरोग तज्ञ)डॉ. अनुप कोठारी, डॉ. सुदर्शन कांबळे, डॉ. जावेद सौदागर, डॉ. वरुण डहाके, डॉ. मिलींद गजभिये, सर्जरी (शल्य चिकित्सक)डॉ. राजा कडूकार, डॉ. अमोल देशपांडे, डॉ. राजु गोरे, डॉ. दर्शित वखारीया, डॉ. प्रणव जाधव,(स्त्रीरोग तज्ञ)डॉ. रजनी कांबळे, डॉ. सबीहा यास्मीन शेख डॉ. सुषमा तारक, डॉ. सारा कोशिश,(बालरोग तज्ञ) डॉ. सारंग तारक, डॉ. मुज़म्मील कोशिश, डॉ. ज़बीह खान,(त्वचारोग तज्ञ)डॉ. प्रज्ञा खडसे, डॉ. धीरज चिंतावार, डॉ. असलम खान,(नाक कान घसा तज्ञ) डॉ. स्नेहा राठोड, डॉ. अर्चना गजभिये, (नेत्ररोग तज्ञ)डॉ. मनोज तगडपल्लेवार, डॉ. परिता नथवाणी, डॉ. उमर तैबानी,(दंतरोग तज्ञ)डॉ. शोएब अकबाणी, डॉ. रेहान पटेल, डॉ. हाजी अमीन घाची, डॉ. फराज़ खान,(जनरल फिजिशियन) डॉ. महेमुद खान, डॉ. खलीक खान (होमिओपेथ), डॉ. शारीक शेख, डॉ. अतीक शेख, डॉ. खालीद अनवर, डॉ. हमा आफरीन, डॉ. फैज़ान अहेमद, डॉ. सदफ राना, डॉ. सोहेल अहेमद हे विशेषज्ञ चिकित्सक गरजू रुग्णांना निःशुल्क सेवा देतील.
यावेळी गोर गरीब व गरजू रुग्णांना डॉक्टर्स रुग्णांच्या उपचारनुसार चेकअप करतील तसेच शहरातील औषध विक्री प्रतिनिधी (एम.आर.) तसेच औषध विक्री क्षेत्रातील मान्यवर मोफत औषध वितरणसाठी सहकार्य करणार आहेत.या शिबिरात रुग्ण नोंदणी सकाळी ९ ते ११ पर्यंत होईल.अशी माहिती शिबिर आयोजकांच्या वतीने देण्यात आली.या आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी दारुलउलूम अनवारुल इस्लाम, पारवा चे मोहत्मिम हाफीज अनिस, मौलवी शारिक,डॉ.मुजीब शेख,मुश्ताक गौरी, निसार अहमद फारुखी,अली इम्रान,साजिद पटेल,शकील अहमद,अशरफ खान यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते अथक प्रयत्न करीत आहे. या निःशुल्क शिबिराचा यवतमाळ शहर,तसेच पारवा व शेजारील गावांच्या गरजू नागरिकांनी व रुग्णांनी आरोग्य तपासणी व निशुल्क औषधी. वितरण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.