Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी विकसित केले “Good Touch Bad Touch” Device! चिमुकल्यांना आता Bad Touch होताच वाजणार बिप.

Yavatmal News : समाजात बाल लैंगिक शोषणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार खूप कडी पावले उचलत आहेत.यासाठी अनेक कायदे बनविण्यात आले आहे.आता समाजात लहान मुले,मुली आणि वाढत्या वयात मुलींनाही शाळा किंवा इतर ठिकाणी कुप्रवूत्तीसून स्वतःचे रक्षण कसे करावे,याची माहिती पालकांना आणि शिक्षकांना व्हावी यासाठी  शाळा आणि घरात GOOD TOUCH BAD TOUCH ची समज आणि शिक्षण देण्यात येते.

विशेषकर चिमुकल्या जीवाना बेड टच चा सामना करावा लागतो.मात्र ते याला समजू शकत नाही,कारण या छोट्या जीवांना बेड  टच काय असतो,किंवा विनयभंग आणि लैंगिक शोषण काय असतो ते सुद्धा माहीत नसते,त्यामुळे या चिमुकल्या जीवांना लैंगिक शोषण होत आहे हेच कळत नाही,त्यामुळे त्यांना असा जाच सहन करावा लागतो,मात्र समाजातून ही  वाईट प्रवूत्ती लगेच ओळखली जावी,जो कोणी वाईट हेतूने चीमुकल्या मुला मुलीना वाईट हेतूने  शारीरिक  स्पर्श  करीत असेल तर हे लगेच ओळखले जावे,यासाठी अनोखा असा “गुड टच-बेड टच”{Good Touch- Bad Touch Device} उपकरण आता दस्तूरखुद्द काही चिमुकल्यांनीच  तयार केले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

उल्लेखनीय म्हणजे चिमुकल्यांनी तयार केलेल्या या कुप्रवृत्ती आणि त्यांच्याकडून होणार्या बेड टच ला पटकन ओळखणाऱ्या या उपकरणाला राज्याच्या शिक्षण विभागाकडून राज्यस्तरावर पहिला क्रमांक देण्यात आला आहे.हा उपकरण जसेच वाईट उद्देशाने चिमुकल्यांना किंवा मुलींना बेड टच होताच तात्काळ ओळखेल.BAD TOUCH लगेच ओळखणाऱ्या या अनोख्या उपकरणाचा महत्वाचा असा प्रयोग केला आहे ते यवतमाळ जिल्ह्यातील वरुडबिबी  या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद सरकारी शाळेत सहाव्या वर्गात शिकणाऱ्या 2 विद्यार्थिनींनी.

या लहान विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा गुड टच-बेड टच उपकरण नव्या काळात बाल आणि वयस्कर मुला मुलींना लैंगिक शोषणापासून वाचविण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड आणि राज्यात पहिला क्रमांक या अनोख्या उपकरणाला.

काही महिन्यापूर्वी राज्य सरकारने राज्यस्तरावर बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी आणि याविरुद्ध सामाजिक स्तरावर मानसिक तयारी व्हावी,या उद्देशाने राज्यस्तरीय हेकेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती.{State Hackathon Competition}.यात महाराष्ट्र राज्यातील एकूण17 हजार 956 विद्यार्थी या स्पर्धेत आपापले विकसित प्रयोग घेवून सहभागी झाले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत यातून 8978 प्रयोग सादर करण्यात आले होते.यात वरुडबिबी या गावातील चिमुकल्यांनी सादर केलेला GOOD TOUCH BAD TOUCH हा बेस्ट उपकरण प्रयोग खूप महत्त्वाचा ठरला.या हेकेथान स्पर्धेत सादर करण्यात आलेले हजारो प्रयोगातून राज्यस्तरावर 88 प्रयोगांना सादरीकरणासाठी निवड झाली होती.

यात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये असलेल्या वरूडबीबी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 6 व्या वर्गात शिकणाऱ्या प्रणाली प्रवीण मुटकुळे आणि संजीवनी  प्रल्हाद मुटकुळे या 2 मुलींनी बनविलेला हा अनोखा आणि लगेच Bed Touch ओळखणारा उपकरण राज्यस्तरीय  स्पर्धेसाठी निवडण्यात आला.

पुणे शिक्षण संचालक शिक्षण प्रकल्प संचालक,बालभारती संचालक. राज्य शिक्षण आयुक्त आदींच्या उपस्थितीत या मुलींच्या अनोख्या प्रयोगाचे आणि त्यांनी विकसित केलेल्या या उपकरणाचे राज्यस्तरीय Hackathonस्पर्धेत सादरीकरण करण्यात आले.आता संपूर्ण महाराष्ट्रातून उमरखेड तालुक्यातील वरुडबिबी या गावातील  जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या प्रणाली प्रवीण मुटकुळे आणि संजीवनी  प्रल्हाद मुटकुळे या दोन मुलींच्या या प्रयोगाला पहिला क्रमांक मिळाला आहे.

Yavatmal News : स्वराज्य संस्था गटातून पहिला क्रमांक संपादन.

राज्यात इयत्ता सहावी ते आठवी या वर्गाच्या सर्व शाळांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात वरूडबीबीच्या या विद्यार्थिनी राज्यस्तरीय स्पर्धेत स्वराज्य संस्था गटातून पहिला क्रमांक संपादन केलेला आहे.

या विद्यार्थिनींना या अनोख्या प्रकल्पासाठी वरूडबिबी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक साहेबलाल शेख,शिक्षक दिगंबर गिरी,केंद्रप्रमुख अरुण गुरुकुले,सुशीलकुमार शहाणे,अवधूत धनंजय, विशाल सूर्यवंशी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.तर  प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा,शिक्षण विभागाचे अधिकारी किशोर पागोडे, डायट शिक्षणाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत गावंडे,अधिव्याख्याता धम्मरत्न वायवळ,जिल्हा परिषदेचे गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड,शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद कांबळे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

हा GOOD TOUCH – BAD TOUCH उपकरण असा काम करतो.

  • उमरखेड तालुक्यातील वरुडबिबी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 6 व्या वर्गात शिकणाऱ्या प्रणाली मुरकुटे आणि संजीवनी मुरकुटे या दोन्ही विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या “स्वतःचे संरक्षण आम्ही स्वतःच करणार”या विषयावर आधारित सदर प्रकल्प सादर केला.
  • यासाठी या दोन्ही विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात खूप छान आणि वाईट प्रवूत्तीला ओळखणारे स्मार्ट असे अनोखे Device विकसित केले आहे.
  • हे उपकरण चिमुकल्या मुला-मुलींना बाल लैंगिक शोषणापासून सुरक्षित ठेवण्यास महत्त्वाची मदत करते.

हे उपकरण स्मार्ट सेन्सर वर {Smart Sensor Device} आधारित असून हा कॅपॅसिटीव  टच सेंटरचा वापर करून लगेच Good Touch Bad Touch ओळखून देते.

  • {Green Light On And Secure Message On Screen}
  • जर कोणाचा शहरीरिक स्पर्श करताना वाईट हेतू नसेल आणि स्पर्श झाला असेल तर हा उपक्रम लगेच हिरवा लाईट सुरु करते आणि यातून एलईडी स्क्रीनवर “तुम्ही सुरक्षित आहात” असा संदेश मिळतो.
  • {Red Light On And Massage On Screen And Beeping}.
  • जर एखाद्याने वाईट हेतूने स्पर्श  करताच बॅड टच {Bad Touch} होत असल्याचा संदेश लाल लाईट सुरु होऊन लगेच मिळते आणि या उपकरणात लावलेला सतत बजर वाजते.
  • सोबतच स्क्रीनवर जोराने “नाही म्हण….’,”पळून जा…”,”मोठ्या माणसांना सांग…”हा सावधगिरीचा संदेश लगेच येतो.

हा प्रयोग राष्ट्रीय स्तरावर नेण्याची तयारी.

उल्लेखनीय म्हणजे या विद्यार्थिनींनी विकसित केलेला हा उपकरण आणि प्रयोग राज्यस्तरावर अव्वल  ठरला असून त्यांचा हा प्रकल्प आता राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

यामुळे राज्य आणि देशभरात चिमुकल्या मुला-मुलींना गुड टच,बेड टच आधारित शिक्षण आणि लैंगिक शोषण शोषणापासून सावधान राहण्यासाठी खूप मदत मिळणार अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four × three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.